उन्हाच्या चटक्याने संपूर्ण राज्यातील लोक हैराण असताना मंगळवारी विदर्भातील अकोल्यामध्ये मोसमातील महाराष्ट्रातील सर्वाधिक कमाल ४६.३ डिग्री सेल्सियस तापमानाची नोंद झाली. संपूर्ण विदर्भातच मंगळवारी पारा चढाच होता. वर्धा, नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ, अमरावती सर्वच ठिकाणी कमाल तापमानात वाढ झाल्याचे दिसून आले. राजस्थानमधील बारमेरमध्येही पारा कमाल ४७.५ डिग्री सेल्सियसवर जाऊन पोहोचला होता.
कमाल तापमान
अकोला – ४६.३
वर्धा – ४६
नागपूर – ४५.९
चंद्रपूर, यवतमाळ, अमरावती – ४४.४
राज्यात १७ ते २१ मे या कालावधीमध्ये उष्णतेची मोठी लाट येण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. आधीच उन्हाच्या काहिलीमुळे नागरिकांचे हाल होत असताना उष्णतेच्या लाटेमुळे कमाल तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी पुरेशी काळजी घेण्याचे आवाहन राज्य सरकारने केले आहे.