राज्यात सध्या जिल्हा परिषद पोट निवडणुकीच्या निकालांची जोरदार चर्चा सुरू आहे. या निवडणुकांकडे आगामी निवडणुकांची रंगीत तालीम म्हणून देखील पाहिलं जात आहे. सर्वच पक्ष या निवडणुकीत आपापली ताकद आजमावत असताना या निवडणुकांमध्ये अनेक अनपेक्षित निकाल लागले आहेत. यामध्ये चर्चेच्या ठरलेल्या कुटासा जिल्हा परिषद गटातली निवडणूक विशेष चर्चेत आली होती. एका बाजूने राष्ट्रवादी काँग्रेसचे अमोल मिटकरी आणि दुसऱ्या बाजूने आपल्या प्रहार पक्षासाठी प्रचार करणारे बच्चू कडू या दोन्ही फायर ब्रँड नेत्यांमुळे ही निवडणूक राजकीय वर्तुळात उत्सुकतेचा विषय ठरली होती. मात्र, अखेर अमोल मिटकरी यांना त्यांच्याच गावात पराभवाचा सामना करावा लागला आहे.
वंचित ६ जागांवर विजयी
अकोला जिल्हा परिषद पोटनिवडणुकांमध्ये एकूण १४ जागांसाठी मतदान झालं. यामध्ये वंचित बहुजन आघाडीनं ६ जागांवर विजय मिळवत जिल्हा परिषदेतील आपलं वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केलं. मात्र, बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षाच्या उमेदवार स्मृती गावंडे यांनी कुटासा गटातून जोरदार मुसंडी मारत विजय संपादन केला. त्यामुळे बच्चू कडू यांच्या पक्षाची जिल्हा परिषदेत एंट्री झाली आहे.
अमोल मिटकरींसाठी प्रतिष्ठेची निवडणूक
बच्चू कडू यांच्या पक्षाकडून स्मृती गावंडे तर राष्ट्रवादीकडून छबुताई राऊत यांच्यात ही लढत होती. जिल्हा परिषदेत पहिला उमेदवार पाठवण्यासाठी बच्चू कडूंनी या निवडणुकीसाठी जोरदार प्रचार केला होता. तर दुसरीकडे अमोल मिटकरी यांचं कुटासा हे गावच असल्यामुळे त्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. आमदार झाल्यानंतर या गावासाठी अमोल मिटकरी यांनी मोठ्या प्रमाणावर निधी दिला होता. त्यामुळे त्यांच्या उमेदवाराचा विजय निश्चित मानला जात असताना मतदारांनी मात्र स्मृती गावंडे यांच्या पारड्यात आपलं मत टाकलं आहे.
Maharashtra ZP Election Results 2021 : अकोल्यात ‘वंचित’चाच वरचष्मा; १४ पैकी ६ जागांवर विजयी!
विजयी उमेदवार
वंचित बहुजन आघाडी
१. शंकरराव इंगळे, घुसर
२. मीना बावणे, अंदुरा
३. सुशांत बोर्डे, कुरणखेड
४. सुनील फाटकर, शिर्ला
५. राम गव्हाणकर, देगाव
६. संगीता आढाव, तळेगाव
राष्ट्रवादी काँग्रेस</strong>
१. सुमन गावंडे, दगडपारवा
२. किरण अवताडे, कानशिवनी
इतर पक्ष
१. जगन्नाथ निचळ (अकोलखेड), शिवसेना
२. गजानन काकड(दानापूर), काँग्रेस
३. माया कावरे(बपोरी), भाजपा<br>४. सम्राट डोंगरदिवे(लाखपुरी), अपक्ष
५. प्रमोदिनी कोल्हे(आडगाव), अपक्ष
६. स्फूर्ती गावंडे(कुटासा), प्रहार