२०१९ साली झालेल्या लोकसभा निवडणुका आणि त्यापाठोपाठ झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्ये प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला फारसा प्रभाव पाडता आलेला नसला, तरी आज निकाल हाती आलेल्या अकोला जिल्हा परिषद पोटनिवडणुकांमध्ये वंचित बहुजन आघाडीनं आपलाच वरचष्मा असल्याचं सिद्ध केलं आहे. अकोल्यातील एकूण १४ जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत ६ जागांवर वंचितनं विजय मिळवला आहे त्याशिवाय, राष्ट्रवादी काँग्रेसनं २ जागांवर मुसंडी मारली आहे. शिवसेना, भाजपा आणि काँग्रेस यांना प्रत्येकी एक जागा जिंकता आली असून इतर ३ उमेदवार निवडून आले आहेत.
दरम्यान, वंचित पाठोपाठ बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षासाठी देखील निकाल साजरा करण्याची संधी आहे. कारण अकोला तालुक्याच्या कुटासा गटातून जिल्हा परिषदेवर बच्चू कडू यांच्या पक्षाच्या स्फूर्ती गावंडे विजयी झाल्या आहेत.
विजयी उमेदवार
वंचित बहुजन आघाडी
१. शंकरराव इंगळे, घुसर
२. मीना बावणे, अंदुरा
३. सुशांत बोर्डे, कुरणखेड
४. सुनील फाटकर, शिर्ला
५. राम गव्हाणकर, देगाव
६. संगीता आढाव, तळेगाव
राष्ट्रवादी काँग्रेस</strong>
१. सुमन गावंडे, दगडपारवा
२. किरण अवताडे, कानशिवनी
इतर पक्ष
१. जगन्नाथ निचळ (अकोलखेड), शिवसेना
२. गजानन काकड(दानापूर), काँग्रेस
३. माया कावरे(बपोरी), भाजपा<br>४. सम्राट डोंगरदिवे(लाखपुरी), अपक्ष
५. प्रमोदिनी कोल्हे(आडगाव), अपक्ष
६. स्फूर्ती गावंडे(कुटासा), प्रहार