Akshay Shinde Shot Dead Badlapur Sexual Assault Case : बदलापूरमधील प्राथमिक शाळेत दोन चिमुकल्या मुलींवरील लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याने पोलिसांवर गोळीबार केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. ठाणे क्राइम ब्रॅचचं पथक अक्षय शिंदे याला घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी घेऊन जात होतं. त्याचवेळी ही घटना घडली. यावेळी अक्षयने पोलीसांजवळील बंदूक हिसकावून त्यांच्या दिशेने गोळीबार केला. यावेळी प्रत्युत्तरादाखल पोलिसांनीही गोळीबार केला. पोलिसांच्या गोळीबारात आरोपी अक्षय शिंदे ठार झाल्याची माहिती समोर आली आहे.

अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार झाल्यानंतर विरोधी पक्षांच्या नेत्यांनी राज्य सरकार व पोलिसांच्या कारभावार प्रश्न उपस्थित केले आहेत. विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणावरून एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टद्वारे त्यांनी या पोलीस चकमक प्रकरणाची न्यायिक चौकशी करण्याची मागणी केली आहे.

atul subhash
Atul Subhash Suicide Case : अतुल सुभाषच्या सासू आणि मेव्हण्याने केलं पलायन; पोलीस म्हणतात, “त्यांना नजरकैदेत…”
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
nia raided Chayanagar Amravati and detained suspected youth for questioning
‘एनआयए’ची अमरावतीत छापेमारी; संशयित युवक ताब्यात, पाकिस्तान कनेक्शन….
eknath shinde avoid delhi visit
शिंदे यांनी दिल्लीवारी टाळली ?
Santosh Deshmukh Murder Case
“…म्हणून माझ्यावर ही वेळ आली का?” मयत सरपंच संतोष देशमुखांच्या आईचा टाहो; पत्नी म्हणाली, “ते १५ वर्षांपासून..”
pune police commissioner amitesh kumar
“४५० ठिकाणचे CCTV, अपहरणासाठी वापरलेली कार अन्…”, पोलीस आयुक्तांनी सांगितलं सतीश वाघ यांच्या मारेकऱ्यांना कसं पकडलं?
Thane Police begins work to record statement of former Director General of Police Sanjay Pandey
माजी पोलीस महासंचालक संजय पांडे यांचा जबाब नोंदविण्याचे काम ठाणे पोलिसांकडून सुरू
mumbai best bus crash driver gets police remand till dec 21
कुर्ला अपघातःचालकाला सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यांत अटक; २१ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी

वडेट्टीवार म्हणाले, “याची न्यायिक चौकशी झालीच पाहिजे! अक्षय शिंदे याने गोळी झाडून घेणे म्हणजे पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का? अक्षय शिंदे याने गोळी नेमकी कशी झाडली? आरोपी अक्षय शिंदे पोलिसांच्या ताब्यात असताना त्याचे हात बांधले नव्हते का? त्याला बंदूक कशी काय मिळाली? पोलीस इतके बेसावध कसे असू शकतात?”

संस्थाचालक भाजपाशी सबंधित, त्याच्यावर कारवाई झाली नाही : वडेट्टीवार

विजय वडेट्टीवार म्हणाले, “बदलापूर प्रकरणात एकीकडे संस्थाचालक भाजपाशी सबंधित असताना संस्थाचालकांवर कारवाई होत नाही, दुसरीकडे आज आरोपी अक्षय शिंदे स्वतःवर गोळी झाडून घेतो हे अतिशय धक्कादायक आणि संशयास्पद आहे. बदलापूर प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेवर आमचा पहिल्यापासून विश्वास नाही. आमची मागणी आहे की आता या प्रकरणाची न्यायिक चौकशी झालीच पाहिजे!”

हे ही वाचा >> बदलापूर शाळा लैंगिक अत्याचार प्रकरण : आरोपी अक्षय शिंदेचा पोलिसांवर गोळीबार; अक्षय चकमकीत ठार

भाजपा पदाधिकाऱ्याला वाचवण्यसाठी, प्रकरण दडपण्यासाठी फेक एन्काउंटर केलं? अनिल देशमुखांचा प्रश्न

पाठोपाठ राज्याचे माजी गृहमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाचे आमदार अनिल देशमुख यांनी देखील या प्रकरणावर भाष्य करणारी एक पोस्ट एक्सवर केली आहे. देशमुख म्हणाले, बदलापूर घटनेतील आरोपी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर झाल्याचे वृत्त समजले. स्वसंरक्षणाचा हा बनाव विश्वास ठेवण्यासारखा नाही. दोन्ही हातात बेड्या असलेला माणूस पोलिसांचेही पिस्तूल कसे हिसकाऊ शकतो. सदर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे जेवढा दोषी होता तितकेच दोषी शाळाचालक भाजपा पदाधिकारी देखील आहेत. आपल्या पक्षातील पदाधिकाऱ्याला वाचवण्यासाठी आणि प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नटिव्ह सेट केले जात आहे.

Story img Loader