Akshay Shinde Encounter: बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातला आरोपी अक्षय शिंदे याचा २३ सप्टेंबरला एन्काऊंटर करण्यात आला. यानंतर अक्षयच्या आई वडिलांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. तर अक्षयच्या मृतदेहाचं दहन केलं जाणार नाही तर अक्षयचा मृतदेह पुरला जाणार अशी माहिती त्याच्या वडिलांनी या प्रकरणात दिलेले वकील अमित कटारनवरे यांनी दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

कोर्टात काय घडलं?

अक्षय शिंदे याच्या एन्काऊंटर प्रकरणी हायकोर्टानं प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. सुनावणी दरम्यान हायकोर्टानं सरकारी वकिलांवर प्रश्नांची सरबत्ती करत हे एन्काऊंटर ( Akshay Shinde Encounter ) होऊच शकत नाही असं म्हटलं. दरम्यान याप्रकरणी आजची सुनावणी संपली असुन पुढील सुनावणी ३ ऑक्टोबरला होणार आहे. यावेळी एन्काऊंटर प्रकरणातील फॉरेन्सिक अहवाल तसंच एन्काऊंटरमध्ये सहभागी असलेल्या सर्व पोलिसांचे सीडीआर सादर करण्याचे आदेश कोर्टानं दिले आहेत.

हे पण वाचा- Akshay Shinde Encounter : ‘बदलापुरा’ अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरनंतर देवेंद्र फडणवीस यांचं हातात बंदुक घेतलेलं पोस्टर झळकलं!

अक्षय शिंदेच्या वडिलांचे वकील अमित कटारनवरे काय म्हणाले?

“पुरावे नष्ट होऊ नयेत म्हणून अक्षय शिंदेचा मृतदेह पुरण्यात येणार आहे. अक्षयच्या मृतदेहाचं दहन होणार नाही. भविष्यात काही पुरावे लागले तर मृतदेह पुन्हा बाहेर काढता येईल. मात्र अक्षय शिंदेच्या आई वडिलांना त्याचा मृतदेह पुरण्यासाठीही जागा मिळालेली नाही. मुलाला न्याय मिळवून द्यायचा अशी कुटुंबाची भावना आहे. कुटुंबाचीच ही भावना आहे की अक्षयचा मृतदेह पुरला जावा. त्यामुळे मृतदेहाचं दहन न होता तो पुरला जाणार आहे.”

बदलापूरमध्ये नेमकी काय घटना घडली?

बदलापूर येथील एका शाळेतील दोन चिमुकल्या विद्यार्थिनींवर अत्याचार झाल्याचे प्रकरण समोर आले होते. या घटनेनंतर बदलापूर मध्ये नागरिकांनी रेल्वे रुळावर उतरून आंदोलन केले होते. या आंदोलनामुळे तणावाचे वातावरण होते. या आंदोलनाची दखल घेत राज्य शासनाने या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एसआयटी नेमली होती. या एसआयटीच्या टीमने या प्रकरणाचा तपास करून कल्याण न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. आता या प्रकरणी चकमकीत अक्षय शिंदे ठार ( Akshay Shinde Encounter ) झाला.

अक्षय शिंदेचा पोलीस चकमकीत मृत्यू

अक्षय शिंदेचा चकमकीत मृत्यू कसा झाला?

अक्षय शिंदे याच्या दुसऱ्या पत्नीने दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी त्याच्या विरोधात अनैसर्गिक लैंगिक संबंध प्रस्थापित केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलिसांनी त्याला ताब्यात घेण्याची प्रक्रिया केली होती. सोमवारी सायंकाळी पोलीस त्याला तळोजा कारागृहातून बाहेर घेऊन जात असताना त्याने पोलीस अधिकाऱ्याची बंदूक हिसकावून पोलिसांवर गोळ्या झाडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ अक्षय याच्यावर गोळीबार करत त्याला ठार ( Akshay Shinde Encounter ) केले. पोलीस वाहनातच हा प्रकार घडला असून यामध्ये सहायक पोलिस निरीक्षक निलेश मोरे यांच्या पायाला गोळी लागल्याने ते जखमी झाले आहेत. आता या प्रकरणी विविध प्रतिक्रिया उमटल्या. आता अक्षय शिंदेचा मृतदेह पुरण्यात येणार आहे अशी माहिती त्याबाबत माहिती दिली.