Akshay Shinde Encounter : बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातला आरोपी अक्षय शिंदे याचा २३ सप्टेंबरला एन्काऊंटर करण्यात आला. यानंतर अक्षयच्या आई वडिलांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. तर अक्षयच्या मृतदेहाचं दहन केलं जाणार नाही तर अक्षयचा मृतदेह पुरला जाणार अशी माहिती त्याच्या वडिलांनी या प्रकरणात दिलेले वकील अमित कटारनवरे यांनी दिली आहे. तसंच आज अक्षयच्या वडिलांच्या वकिलांनी एक नवी मागणी केली आहे.
काय म्हटलं आहे वकील अमित कटारनवरेंनी?
आम्ही माननीय न्यायालयाला विनंती केली आहे की बदलापूरमध्ये अक्षय शिंदेचा मृतदेह ( Akshay Shinde Encounter ) पुरण्यासाठी जागा उपलब्ध करुन द्यावी. कारण मृतदेह दफन करण्यासाठी जागा मिळत नाही. त्या विषयावर सरकारच्या वतीने सांगितलं की आम्ही त्याबाबत योग्य ती काळजी घेऊ. पण संध्याकाळपर्यंत जागा मिळालेली नाही. आज सकाळी पुन्हा एकदा अक्षय शिंदेच्या आई वडिलांना बोलवण्यात आलं होतं. दोन ते तीन ठिकाणी त्यांना जागा दाखवण्यात येईल. तसंच अक्षय शिंदेच्या आई वडिलांना संरक्षण दिलं जावं अशी मागणी आम्ही न्यायालयात केली आहे. किरीट सोमय्यांना जसं संरक्षण दिलं तसंच अक्षय शिंदेच्या आई वडिलांना सुरक्षा द्यावी. कारण त्यांच्यावर आधीही हल्ला झाला आहे. जी काही टीका माझ्यावर केली जाते आहे ती सरकार स्पॉन्सर्ड आहे. अक्षय शिंदेने ( Akshay Shinde Encounter ) नेमकं काय केलं? चार्जशीटच समोर आलेली नाही. शाळेचे मुख्य आरोपी पोलिसांच्या हाती लागत नाही हे सरकारचं अपयश आहे. अक्षय शिंदेच्या आई वडिलांच्या जिवाला धोका आहे त्यामुळे त्यांनी संरक्षण मागितलं आहे. अशी माहिती अमित कटारनवरे यांनी दिली आहे.
बदलापूरमध्ये नेमकी काय घटना घडली?
बदलापूर येथील एका शाळेतील दोन चिमुकल्या विद्यार्थिनींवर अत्याचार झाल्याचे प्रकरण समोर आले होते. या घटनेनंतर बदलापूर मध्ये नागरिकांनी रेल्वे रुळावर उतरून आंदोलन केले होते. या आंदोलनामुळे तणावाचे वातावरण होते. या आंदोलनाची दखल घेत राज्य शासनाने या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एसआयटी नेमली होती. या एसआयटीच्या टीमने या प्रकरणाचा तपास करून कल्याण न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. आता या प्रकरणी चकमकीत अक्षय शिंदे ठार ( Akshay Shinde Encounter ) झाला.
हे पण वाचा- Sanjay Raut: “त्याचाही एन्काऊंटर करा, आम्ही पाठिंबा देऊ”, संजय राऊत यांचे शिंदे-फडणवीसांना आव्हान
अक्षय शिंदेचा चकमकीत मृत्यू कसा झाला?
अक्षय शिंदे याच्या दुसऱ्या पत्नीने दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी त्याच्या विरोधात अनैसर्गिक लैंगिक संबंध प्रस्थापित केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलिसांनी त्याला ताब्यात घेण्याची प्रक्रिया केली होती. सोमवारी सायंकाळी पोलीस त्याला तळोजा कारागृहातून बाहेर घेऊन जात असताना त्याने पोलीस अधिकाऱ्याची बंदूक हिसकावून पोलिसांवर गोळ्या झाडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ अक्षय याच्यावर गोळीबार करत त्याला ठार ( Akshay Shinde Encounter ) केले. पोलीस वाहनातच हा प्रकार घडला असून यामध्ये सहायक पोलिस निरीक्षक निलेश मोरे यांच्या पायाला गोळी लागल्याने ते जखमी झाले आहेत. आता या प्रकरणी विविध प्रतिक्रिया उमटल्या.