Akshay Shinde Encounter by Police Badlapur Sexual Assault Case : बदलापूरमधील चिमुरड्या मुलींच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याने पोलिसांच्या हातातील बंदूक हिसकावून गोळीबार केला आणि पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी, पोलिसांनी स्वरक्षणार्थ गोळीबार केला त्या गोळीबारात अक्षय शिंदे जागीच ठार झाला. ठाणे क्राइम ब्रॅचचं पथक अक्षय शिंदे याला घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी घेऊन जात होतं. त्यावेळी हा प्रकार घडला. दरम्यान, ही घटना हाताळताना किंवा अक्षय शिंदेला घटनास्थळी नेताना पोलीस व क्राईम ब्रँचच्या पथकाकडून हलगर्जीपणा झाला असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. दुसऱ्या बाजूला मृत अक्षय शिंदेच्या आई-वडिलांनी पोलिसांच्या हेतूवर संशय व्यक्त केला आहे. तसेच त्यांनी अक्षयचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवारांनी या प्रकरणात पोलिसांनी हलगर्जीपणा केल्याची टीका केली आहे. पवार म्हणाले, पीडित मुलींना न्याय मिळण्यासाठी कायद्याच्या योग्य चौकटीतून आरोपीला फाशी झाली पाहीजे होती. परंतु, या घटनेतील मुख्य आरोपीला स्थलांतरीत करताना गृह विभागाने दाखवलेला हलगर्जीपणा संशयास्पद आहे. भविष्यात अशा निंदनीय कृत्याची कल्पनाही कोणाच्या मनाला शिवणार नाही, यासाठी कायद्याचा धाक निर्माण झाला पाहिजे. मात्र पोलीस व शासन दुर्बल ठरलंय.

scammer pretending to be police officer calls real cop
‘शिकारी खुद यहां शिकार हो गया’, सायबर चोरट्याचा पोलिसाला गंडा घालण्याचा प्रयत्न; नंतर झालं असं काही
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
lokjagar article about issues in maharashtra assembly election
लोकजागर : भीती आणि आमिष!
Oppositions stole promises along with schemes criticized Eknath Shinde in Ambernath
“विरोधकांनी योजनांसह वचननामाही चोरला…”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची अंबरनाथमध्ये टीका
airoli vidhan sabha marathi news
ऐरोलीतील बंडोबांना शिंदे सेनेचे अभय ?
Eknath Shinde allegation regarding Mahavikas Aghadi manifesto Jalgaon news
महाविकास आघाडीने जाहीरनामा चोरला; एकनाथ शिंदे यांचा आरोप
Shrikant Shinde criticizes Uddhav Thackeray over bag checking
बँगा तपासल्या तर आगपाखड कशासाठी ? श्रीकांत शिंदे यांची उध्दव ठाकरे यांच्यावर टीका
Eknath Shinde, Eknath Shinde comment on Mahavikas Aghadi, Mehkar,
मुख्यमंत्री शिंदे म्हणतात, “धनुष्य चोरायला ते काही खेळणं आहे का? लाडक्या बहिणींना एकविसशे रुपये…”

पोलिसांनी पैसे घेऊन आमच्या मुलाला मारलं; अक्षयच्या वडिलाच आरोप

अक्षय शिंदेच्या वडिलांनी पोलिसांवर आरोप केले आहेत. ते म्हणाले, “या प्रकरणात इतर सहा आरोपी आहेत. पोलिसांनी त्यांना शोधलं नाही आणि आमच्या पोराला मारुन टाकलं. इतरांना वाचवण्यासाठीच आमच्या पोराला मारलं. आम्ही सध्या स्टेशनवर कचऱ्यात राहतो, तिथेच झोपतो. पोलिसांनी अक्षयला पकडून नेलं, तेव्हापासून आम्ही फरार आहोत, प्रसारमाध्यमांसमोर आलो नाही. याप्रकरणात जे दोषी आहेत, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, त्यांना शिक्षा झाली पाहिजे. त्याशिवाय आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही. अन्यथा आम्हालाही गोळ्या घालून ठार मारा, आम्ही मरायला तयार आहोत. पोलिसांनी पैसे घेऊन, कट रचून माझ्या मुलाला मारलं आहे.

अक्षयच्या आईचे पोलिसांवर गंभीर आरोप

अक्षय शिंदेच्या आईने पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. अक्षयची आई म्हणाली, आम्ही अक्षयला भेटायला तुरुंगात गेले होतो, तेव्हा त्याने मला विचारले, ‘मम्मी मला केव्हा घेऊन जाणार तुम्ही?’ मी त्याला म्हणाले की मी वकिलांशी बोलून घेते, आपण एका महिन्यानंतर तुला सोडवू. त्यानंतर मी अक्षयला विचारलं की, तुला खायला-प्यायला देतात का? त्यावर अक्षयने, हो मला खायला देतात. अक्षयने तुरुंगात मला मोठा कागद दाखवला. यामध्ये काय आहे वाचून बघ असं तो म्हणाला. पण मला वाचता येत नाही. तो कागद अक्षयच्या खिशात ठेवला होता. त्यामध्ये काय लिहलं होतं ते मला माहिती नाही. मात्र, पोलिसांनीच तो कागद अक्षयच्या खिशात ठेवला असेल. त्या लोकांनीच मुद्दाम, हा पोरगा असं करुन घेणार, असे कागदावर काहीतरी लिहून, तो अक्षयच्या खिशात ठेवला असावा. त्या लोकांना अक्षयला मारायचं होतं, म्हणूनच त्याच्या खिशात ती पावती ठेवली असेल.

वडेट्टीवार व देशमुखांचा पोलिसांच्या कारभारावर आक्षेप

विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले, “या चकमकीची न्यायिक चौकशी झाली पाहिजे! अक्षय शिंदे याने गोळी झाडून घेणे म्हणजे पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का? अक्षय शिंदे याने गोळी नेमकी कशी झाडली? आरोपी अक्षय शिंदे पोलिसांच्या ताब्यात असताना त्याचे हात बांधले नव्हते का? त्याला बंदूक कशी काय मिळाली? पोलीस इतके बेसावध कसे असू शकतात?” तर, माजी गृहमंत्री व शरद पवार गटाचे आमदार म्हणाले, स्वसंरक्षणाचा हा बनाव विश्वास ठेवण्यासारखा नाही. दोन्ही हातात बेड्या असलेला माणूस पोलिसांचे पिस्तूल कसे हिसकाऊ शकतो? सदर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे जेवढा दोषी होता तितकेच दोषी शाळाचालक भाजपा पदाधिकारी देखील आहेत. आपल्या पक्षातील पदाधिकाऱ्याला वाचवण्यासाठी आणि प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नटिव्ह सेट केले जात आहे.

मुख्यमंत्री शिंदे काय म्हणाले?

“तपासासाठी पोलीस अक्षय शिंदेला घेऊन जात होते. याचदरम्यान त्याने सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक निलेश मोरे यांच्यावर गोळीबार केला. यामध्ये मोरे जखमी झाले. त्यानंतर पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी प्रत्युत्तरादाखल गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती मला मिळाली आहे. या घटनेबाबत पोलीस तपासानंतर अधिक माहिती समोर येईल.

पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ गोळीबार केला : फडणवीस

“अक्षय शिंदेच्या पूर्व पत्नीने लैंगिक अत्याचाराची तक्रार केली होती. यासंदर्भात चौकशी करण्यासाठी त्याला नेलं जात होतं. त्यावेळी त्याने पोलिसांजवळील बंदूक हिसकावून पोलिसांच्या दिशेने गोळीबार केला. त्यामुळे पोलिसांनीही स्वसंरक्षणार्थ त्याच्या दिशेने गोळीबार केला. त्यात तो जबर जखमी झाला. त्यानंतर त्याला रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.

कसा झाला अक्षय शिंदेचा एन्काऊंटर?

१) अक्षयच्या दुसऱ्या पत्नीने त्याच्याविरोधात केलेल्या अनैसर्गिक लैंगिक अत्याचाराच्या तक्रारीनंतर बदलापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी अक्षयला ताब्यात घेण्यासाठी पोलिसांचे पथक सोमवारी (२३ सप्टेंबर) तळोजा कारागृहात पोहोचले.

२) सोमवार (२३ सप्टेंबर) सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास पोलिसांच्या वाहनातून नेले जात असताना मुंब्रा बाह्यवळण मार्गावर अक्षयने एका अधिकाऱ्याची बंदूक हिसकावून तीन गोळ्या झाडल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.

३) या घटनेत एक गोळी सहाय्यक पोलीस निरीक्षक नीलेश मोरे यांच्या मांडीला लागून ते जखमी झाल्यानंतर प्रत्युत्तरात पोलीस अधिकाऱ्याने अक्षयवर गोळ्या झाडल्या, असे पोलिसांनी म्हटले आहे.

४) ठाणे मध्यवर्ती गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजय शिंदे यांनी अक्षयवर गोळ्या झाडल्याचे समजते. मात्र, पोलिसांच्या प्रसिद्धीपत्रकात त्यांचा उल्लेख नाही.