Akshay Shinde Encounter : बदलापूर येथील प्रतिथयश शाळेत दोन चिमुरड्यांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या अक्षय शिंदेचा एन्काऊंटर सोमवारी (२३ सप्टेंबर) पोलिसांनी केला. अक्षय शिंदेला तळोजा तुरुंगातून घेऊन येत असताना त्याने पोलिसांची बंदुक हिसकावून गोळीबार केला. त्यानंतर उत्तरादाखल झालेल्या गोळीबारात अक्षय शिंदे ठार ( Akshay Shinde Encounter ) झाला. यावरुन विरोधकांनी देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टीका केली. गृहखात्याच्या हलगर्जीपणामुळे हे घडल्याचं शरद पवार, उद्धव ठाकरे, संजय राऊत, सुप्रिया सुळे, नाना पटोले यांनी म्हटलं. या सगळ्याला एक दिवस उलटत नाही तोच देवेंद्र फडणवीस यांचं हातात रिव्हॉल्वर असलेलं आणि बदलापुरा असं लिहिलेलं पोस्टर झळकलं.

काय आहे बदलापुराच्या पोस्टरमध्ये?

मुंबईतल्या काही भागांमध्ये ‘बदलापुरा’ हे लिहिलेली पोस्टर्स लावण्यात आली आहेत. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो असलेले अनेक बॅनर मुंबईत लावण्यात आले असून, त्यावर ‘बदला पुरा’ असं लिहण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर या पोस्टरवरती देवेंद्र फडणवीस यांच्या हातात रिव्हॉल्व्हर (बंदूक) दाखवण्यात आली आहे. हे पोस्टर सोशल मीडियावरही व्हायरल झालं आहे. दुसरीकडे या पोस्टरवरुन विरोधकांनी देवेंद्र फडणवीसांवर टीका सुरु केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात अद्याप कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

Eknath shinde and ajit pawar (1)
NDA च्या बैठकीला अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रतिनिधी गैरहजर; एकनाथ शिंदे म्हणाले, “स्वार्थ भावनेने…”
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
kedar shinde post for suraj chavan
“सूरज चव्हाण या तुमच्यातल्या माणसाला…”, दिग्दर्शक केदार शिंदे यांची पोस्ट चर्चेत
Brigadier Amitabh Jha acting UN peacekeeping force commander passes away
व्यक्तिवेध : ब्रिगेडियर अमिताभ झा
Shinde Fadnavis move by transferring Gadchiroli District Collector Gadchiroli news
गडचिरोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांची बदली करून शिंदेना फडणवीसांचा शह?
Image of a news headline
कोण आहे पाकिस्तानातून भारतात हल्ले घडवणारा रणजीत सिंह नीता? ट्रक ड्रायव्हरने कशी केली खलिस्तान झिंदाबाद फोर्सची स्थापना?
Kedar shinde suraj Chavan jhapuk jhupuk movie muhurta photos viral
केदार शिंदे दिग्दर्शित ‘झापुक झुपूक’ चित्रपटाचा मुहूर्त पार पडला, सूरज चव्हाणसह मालिकाविश्वातील ‘हे’ लोकप्रिय चेहरे झळकणार
tiger attack on cow
VIDEO: शिकार करो या शिकार बनो! ताडोबामध्ये वाघानं पर्यटकांसमोरच केला गायीवर हल्ला; शेवटी कोण पडलं कुणावर भारी?

हे पण वाचा- Akshay Shinde Encounter :”अक्षय शिंदेला गोळ्या घालून मारण्यापेक्षा थेट…”, उदयनराजेंची तीव्र प्रतिक्रिया

बदलापूरमध्ये नेमकी काय घटना घडली?

बदलापूर येथील एका शाळेतील दोन चिमुकल्या विद्यार्थिनींवर अत्याचार झाल्याचे प्रकरण समोर आले होते. या घटनेनंतर बदलापूर मध्ये नागरिकांनी रेल्वे रुळावर उतरून आंदोलन केले होते. या आंदोलनामुळे तणावाचे वातावरण होते. या आंदोलनाची दखल घेत राज्य शासनाने या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एसआयटी नेमली होती. या एसआयटीच्या टीमने या प्रकरणाचा तपास करून कल्याण न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. आता या प्रकरणी चकमकीत अक्षय शिंदे ठार ( Akshay Shinde Encounter ) झाला.

अक्षय शिंदेचा चकमकीत मृत्यू कसा झाला?

अक्षय शिंदे याच्या दुसऱ्या पत्नीने दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी त्याच्या विरोधात अनैसर्गिक लैंगिक संबंध प्रस्थापित केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलिसांनी त्याला ताब्यात घेण्याची प्रक्रिया केली होती. सोमवारी सायंकाळी पोलीस त्याला तळोजा कारागृहातून बाहेर घेऊन जात असताना त्याने पोलीस अधिकाऱ्याची बंदूक हिसकावून पोलिसांवर गोळ्या झाडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ अक्षय याच्यावर गोळीबार करत त्याला ठार ( Akshay Shinde Encounter ) केले. पोलीस वाहनातच हा प्रकार घडला असून यामध्ये सहायक पोलिस निरीक्षक निलेश मोरे यांच्या पायाला गोळी लागल्याने ते जखमी झाले आहेत. आता या प्रकरणी विविध प्रतिक्रिया उमटल्या. आता बदलापुराची चर्चा रंगली आहे.

Story img Loader