Akshay Shinde Encounter : बदलापूर येथील शाळेतील दोन चिमुकल्या विद्यार्थिनीवर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे ( Akshay Shinde Encounter ) याचा सोमवारी सायंकाळी मुंब्रा बाह्यवळण मार्ग येथे पोलीस चकमकीत मृत्यू झाला. यामध्ये सहायक पोलिस निरीक्षक निलेश मोरे यांच्या पायाला गोळी लागल्याने ते जखमी झाले आहेत. बदलापूरमध्ये ऑगस्ट महिन्यात ही घटना घडली होती. एका प्रतिथयश शाळेतील दोन चिमुरड्यांवर अक्षय शिंदेने ( Akshay Shinde Encounter ) लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर ही घटना जेव्हा उघडकीस आली तेव्हा नागरिकांनी बदलापूर बंदची हाक दिली होती. ९ तास रेल रोकोही करण्यात आला होता. यानंतर विविध प्रतिक्रिया येत आहेत. उदयनराजेंनी त्याला तुडवून मारलं पाहिजे होतं असं म्हटलं आहे.

बदलापूरमध्ये नेमकी काय घटना घडली?

बदलापूर येथील एका शाळेतील दोन चिमुकल्या विद्यार्थिनींवर अत्याचार झाल्याचे प्रकरण समोर आले होते. या घटनेनंतर बदलापूर मध्ये नागरिकांनी रेल्वे रुळावर उतरून आंदोलन केले होते. या आंदोलनामुळे तणावाचे वातावरण होते. या आंदोलनाची दखल घेत राज्य शासनाने या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एसआयटी नेमली होती. या एसआयटीच्या टीमने या प्रकरणाचा तपास करून कल्याण न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. आता या प्रकरणी चकमकीत अक्षय शिंदे ठार ( Akshay Shinde Encounter ) झाला आहे.

Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : “कधी कधी काही घटना घडतात, पण…”; मुंबईत सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यानंतर फडणवीसांची प्रतिक्रिया
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Suresh Dhas On Dhananjay Munde
Maharashtra News Updates : धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत सुरेश धस यांचं मोठं विधान; म्हणाले, “राजीनामा घेणं…”
Chandrapur District , Junona Ballarpur route, tiger ,
VIDEO : जेव्हा जंगलाचा राजा आला रस्त्यावर…
Image Of Walmik Karad
Walmik Karad : वाल्मिक कराडवर मकोका लावल्यानंतर परळीत तरुणीकडून आत्मदहनाचा प्रयत्न
Controversy over MLA Suresh Khades statement about Miraj constituency as mini Pakistan
मिरजेच्या उल्लेखावरून वातावरण तापले
dcm eknath shinde loksatta news
“सर्वसामान्यांसाठी राज्यात परवडणारे घरी उभारण्याचा आमचा अजेंडा”, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती
nitin gadkari
Nitin Gadkari : करोना, दंगली, लढायांपेक्षा अधिक मृत्यू अपघातांमुळे… खुद्द गडकरींनीच…

उदयनराजे नेमकं काय म्हणाले?

“सत्ताधारी असो किंवा विरोधक यांच्या कुटुंबासह अशी काही घटना घडली असती तर काय केलं असतं? बोलले असते का? मग त्या कुटुंबाचं काय? ज्यांना या प्रसंगाला सामोरं जावं लागतं. मी त्यांच्या ठिकाणी स्वतःला ठेवून हे बोलतो आहे. अक्षय शिंदेला गोळ्या घालून मारणं फारच सहज झालं. अशा लोकांना जनतेत सोडलं पाहिजे आणि जनतेने त्यांना तुडवून मारलं पाहिजे.” अशी बेधडक प्रतिक्रिया उदयनराजेंनी दिली आहे.

हे पण वाचा- “आता मी एकालाही जिवंत सोडणार नाही”, बंदूक हातात येताच अक्षय शिंदे याने पोलिसांवर झाडल्या गोळ्या, हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल

अक्षय शिंदेचा चकमकीत मृत्यू कसा झाला?

अक्षय शिंदे याच्या दुसऱ्या पत्नीने दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी त्याच्या विरोधात अनैसर्गिक लैंगिक संबंध प्रस्थापित केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलिसांनी त्याला ताब्यात घेण्याची प्रक्रिया केली होती. सोमवारी सायंकाळी पोलीस त्याला तळोजा कारागृहातून बाहेर घेऊन जात असताना त्याने पोलीस अधिकाऱ्याची बंदूक हिसकावून पोलिसांवर गोळ्या झाडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ अक्षय याच्यावर गोळीबार करत त्याला ठार केले. पोलीस वाहनातच हा प्रकार घडला असून यामध्ये सहायक पोलिस निरीक्षक निलेश मोरे यांच्या पायाला गोळी लागल्याने ते जखमी झाले आहेत. आता या प्रकरणी विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.

Story img Loader