गडचिरोली जिल्ह्यातील पशुपक्षी आणि वनराईने नटलेल्या ‘आल्लापल्ली’ या परिसराला महाराष्ट्रातील पहिले जैववैविध्य वारसा स्थळ म्हणून जाहीर केले जाणार आहे. जैववैविध्याचा वारसा लाभलेल्या स्थळांची पहिली सूची महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाने तयार केली असून त्यात ‘आल्लापल्ली’चा समावेश आहे. अमरावती जिल्ह्य़ातील केकतपूर तलाव, सारस, माळढोक आणि तणमोर प्रजनन क्षेत्रांनाही जैववैविध्य नकाशावर स्थान मिळाले आहे.
वैज्ञानिक व्यवस्थापनाच्या देखरेखीखाली असलेल्या आलापल्लीचे वनवैभव अत्यंत समृद्ध असून महाराष्ट्रातील पहिले जैववैविध्य वारसा स्थळ होण्याचे भाग्य या नक्षलग्रस्त गावाला मिळेल. महाराष्ट्र राज्य जैववैविध्य मंडळाच्या नागपुरातील वनभवनात गुरुवारी रात्रीपर्यंत चाललेल्या बैठकीत जैववैविध्य वारसा स्थळांची सूची तयार करण्यात आली. या सूचीला मंडळाने तत्त्वत: मान्यता दिली आहे. मंडळाचे अध्यक्ष डॉ. ई. भरुचा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मंडळाचे सदस्य सचिव व अतिरिक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक (मानव संसाधन) अनमोल कुमार, राज्याचे प्रधान वन सचिव (वने) प्रवीण परदेशी, मुख्य वन्यजीव संरक्षक एस.डब्लू.एच. नकवी आणि वनबलप्रमुख व विशेष निमंत्रित आलोक जोशी तसेच सदस्यांपैकी किशोर रिठे, डॉ. एस.आर. उपस्थित होते.
‘ग्लोरी ऑफ आलापल्ली’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आलापल्लीवर नक्षलवाद्यांचा प्रभाव असला तरी जैववैविध्याचे वारसा स्थळ म्हणून हा प्रदेश सुरक्षित करण्याचा निर्णय बैठकीत झाला. जैववैविध्याच्या व्याख्येतील वन्यजीव, पशुपक्षी, जीवाष्म, आदिवासींची पारंपरिक संस्कृती, भौगोलिक चक्राला निर्माण झालेल्या धोक्यांचा आढावा बैठकीत घेण्यात आला. जैवविविधता कायदा २००२ च्या माध्यमातून जैववैविध्याच्या संरक्षणाची उद्दिष्टे साध्य केली जाणार असून यात जैविक संसाधने आणि अशा संसाधनांपासून मिळणाऱ्या लाभांचे समान वाटप केले जाणार आहे. मंडळाला जैववैविध्य वारसा स्थळे जाहीर करण्याचे अधिकार राहणार असून या स्थळांवर स्थानिक समुदायांचे नियंत्रण/व्यवस्थापन राहील. यासाठी संबंधित समुदायांना राज्य जैववैविध्य निधीतून अनुदान दिले जाईल, अशी माहिती किशोर रिठे यांनी दिली.

भिवगण, शिवडी रामसर स्थळे
भिवगण (उजनी), शिवडी (मुंबई)ला नुकतीच रामसर स्थळे म्हणून मान्यता देण्यात आली असून साताऱ्यातील कासचे पठार, नाशिकचे कुरण, गोंदियातील सारस, चंद्रपूर जिल्ह्य़ातील वरोऱ्यातील माळढोक, सिरोंचातील जीवाष्म स्थळ आणि अकोला जिल्ह्य़ातील तणमोर प्रजनन क्षेत्रांनाही जैववैविध्याच्या यादीत समाविष्ट करण्यात आले आहे.

pune metropolis have lack of basic facilities and infrastructure
बकालीकरणाकडे…
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Engravings on the wheels
चित्रास कारण की: जमिनीवरची मेंदी
Bad weather in Mumbai Measures against pollution Mumbai print news
मुंबईत निवडणुकीपर्यंत प्रदूषणाचा त्रास; मनुष्यबळाअभावी पालिकेची यंत्रणा हतबल
maharshtra electoral history
महाराष्ट्राची निर्मिती, काँग्रेसचे वर्चस्व, हिंदुत्वाचा उदय; महाराष्ट्र निवडणुकीचा इतिहास काय सांगतो?
slum MIDC
एमआयडीसीलाही झोपड्यांच्या जागा, ‘क्लस्टर’साठी साडेबारा टक्के योजनेचा प्रस्ताव
The decision regarding the permission of the meeting at Shivaji Park Maidan is now with the Urban Development Department mumbai news
शिवाजी पार्क मैदानवरील सभेच्या परवानगीचा निर्णय आता नगरविकास विभागाकडे