रात्रीच्या वेळी एका सात वर्षांच्या मुलाला त्याच्या बॅगसह एका प्रवाशाने पाहिले. प्रसंगावधान राखून या मुलाला प्रवाशाने पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यानंतर या मुलाच्या बॅगमध्ये साडेसहा लाख रुपये असल्याची माहिती समोर आली आहे. या पैशांच्या बॅगसह पोलिसांनी या मुलाला त्याच्या पालकांच्या स्वाधीन केले आहे. प्रवासी तुषार नरेंद्र पाटील याचा पोलिसांनी सत्कारही केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

तुषार पाटील हा वैतरणा, तलावपाडा येथे वास्तव्य करणारा तरुण नाईट ड्युटीसाठी घरून निघाला. वैतरणा रेल्वे स्थानकावर गाडीची वाट बघत होता. त्याचवेळी त्याला समोरच्या प्लॅटफॉर्मवर एक चिमुरडा वाट उभा असलेला दिसला आणि त्याच्या पाठीवर सॅकही दिसली. मुलगा हरवलेला असावा असे तुषारला वाटले त्यामुळे त्याने या मुलाची विचारपूस केली. वडील उतरले आणि मी इथेच राहून गेलो असे या मुलाने तुषारला सांगितले. नसीर रजाक खान हे माझे नाव आहे आणि आपण अन्सारीनगर नालासोपारा येथे रहात असल्याचेही त्याने तुषारला सांगितले. तुषार आणि त्याच्या मित्राने चिमुरड्याची ओळख पटवण्यासाठी त्याच्या पाठीवर असलेली बॅग तपासली. तेव्हा तुषार आणि त्याच्या मित्राला 2 हजार आणि 500 च्या काही नोटा त्याच्या बॅगेत दिसल्या. ज्यानंतर या मुलाला घेऊन तुषारने आणि त्याच्या मित्राने विरार पोलीस ठाणे गाठले आणि या मुलाला पोलिसांच्या स्वाधीन केले आणि घडलेला प्रकारही सांगितला.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम पवार यांनी पोलीस ठाण्यातील अंमलदाराला सांगून नसीरच्या बॅगमधले पैसे तपासले. जी रक्कम 6 लाख 48 हजारांच्या घरात होती. यानंतर पोलिसांनी या मुलाच्या वडिलांना बोलवून घेतले आणि त्यांच्या स्वाधीन केले. मोठी रक्कम घेऊन वर्दळ नसलेल्या स्टेशनवर हा मुलगा एकटाच सापडला असता तर त्याच्यासोबत काहीही घडू शकले असते. मात्र तुषार पाटील या प्रवाशामुळे या मुलाचा जीवही वाचला आणि साडेसहा लाख रुपयेही वाचले.