दिल्लीतील एम्स रुग्णालयाच्या धर्तीवर अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालय ई-रुग्णालय म्हणून विकसित करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. मात्र दीड वर्षांनंतरही हा प्रकल्प कार्यान्वयित होऊ शकलेला नाही. त्यामुळे ई-रुग्णालयासाठी पुरवण्यात आलेली संगणकीय प्रणाली धूळ खात पडली आहे. दिल्लीतील एम्स रुग्णालयाच्या धर्तीवर राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयांचे संगणकीकरण केले जाणार आहे. सुरुवातीला अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात प्रायोगिक तत्त्वावर ही योजना राबविली जाणार आहे. ई-रुग्णालय नामक या योजनेतून रुग्णालयातील आंतररुग्ण विभाग, बाह्य़रुग्ण विभाग, प्रयोगशाळा, औषध भांडार, आपत्कालीन विभाग, शस्त्रक्रिया विभाग संगणकांनी जोडले जाणार आहेत. दैनंदिन कामकाजात सुसूत्रता यावी आणि रुग्णालयातील कागदांचा अपव्यय टाळावा, रुग्णाचे आजार आणि त्यावरील उपचारांची अचूक नोंद (डॉक्युमेंटेशन) ठेवता यावी हा यामागचा मूळ उद्देश आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा