अलिबाग- अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्या प्रकरणी आरोपीला अलिबाग जिल्हा व सत्र न्यायालयाने तीन वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. केवीन सतिश म्हात्रे असे शिक्षा सुनीवण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. सदरचा गुन्हा अलिबाग तालुक्तील किहीम २२ डिसेंबर २०२१ रोजी घडला होता. पिडीत मुलगी तिच्या मैत्रिणी समवेत शाळेतून घरी चालली होती. यावेळी आरोपी केवीन म्हात्रे तिथे मोटरसायकल घेऊन आला आणि मुलींसमोर विकृत चाळे करू लागला.
हेही वाचा >>> “राज ठाकरे मोदींच्या गॅरंटीवर देशाला पुढे नेण्यासाठी…”, बावनकुळेंचं सूचक वक्तव्य; मनसेच्या जागांच्या कथित मागणीवरही भाष्य
१८ जानेवारी २०२२ आणि २१ जानेवारी २०२२ ला पुन्हा त्याने पिडीत मुलगी आणि मैत्रिणींसमोर विकृत चाळे केले. अश्लील अंगविक्षेप केले. त्यानंतर पिडीत मुलीचा विनयभंग केला. त्यामुळे २८ जानेवारी २०२२ रोजी यासंदर्भातील फिर्याद मांडवा सागरी पोलीस ठाण्यात नोंदवली. त्यानुसार आरोपी केवीन सतिश म्हात्रे याच्या विरोधात भा. द. वि. सं. कलम ३५ ४ अ(१) तसेच पोक्सो कायदा कलम ७.८.११ या कलमां आंतर्गत गुन्हा दाखल केला होता या प्रकरणाची सुनावणी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाध्रीश ए. एस. राजंदेकर यांच्या न्यायालयात झाली. सदर खटल्यात विशेष शासकीय अभियोक्ता म्हणून अँड. स्मिता धुमाळ-पाटील यांनी काम पाहीले.
हेही वाचा >>> मासिक सभेत महिला सदस्याची महिला सरपंचांना मारहाण, शिवीगाळ
सुनावणी दरम्यान १३ जणांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या. यात फिर्यादी मुलगी, पिडीत साक्षीदार मुलगी, तपासिक अंमलदार, नायब तहसिलदार अजित टोळकर, महिला पोलीस निरीक्षक डी पी खाडे यांच्या साक्षी महत्वपुर्ण ठरल्या. दोन्ही बाजूचे युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने सरकारी अभियोक्ता स्मिता धुमाळ पाटील यांचा युक्तीवाद ग्राह्य धरला. आणि आरोपी दोषी पकडून तीन वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षा आणि सहा हजार रुपयांचा दंडही ठोठावला. या प्रकरणात पैरवी अधिकारी म्हणून पोलीस हवालदार सचिन खैरनार, पोलीस शिपाई प्रियांका सायगावकर यांनी सहकार्य केले.