सोलापूर : विरोधकांकडून कितीही अफवा पसरविल्या जात असल्या तरी महायुती सरकार ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’च काय, अन्य कोणत्याही योजना बंद करणार नाही. आगामी विधानसभा निवडणुकीत विरोधकांना त्यांची जागा दाखवून पुन्हा महायुतीला साथ दिल्यास सर्व कल्याणकारी योजना पुढील पाच वर्षे अव्याहतपणे सुरू राहतील, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस आणि अजित पवार यांनी दिली. आगामी विधानसभा निवडणुकीत आयाबहिणींसह सर्वांनी महायुतीच्या तिन्ही घटक पक्षांना निवडून द्यावे, असे आवाहन या दोन्ही नेत्यांनी केले.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या वचनपूर्ततेनिमित सोलापुरात यापूर्वी तीन वेळा स्थगित झालेला लाभार्थी महिलांचा शासकीय महामेळावा मंगळवारी पार पडला. हजारो लाभार्थी महिलांच्या उपस्थितीत झालेल्या या महामेळाव्यातून महायुतीकडून आगामी निवडणुकीचे रणशिंगच फुंकले. यावेळी फडवणीस आणि पवार यांनी विरोधकांवर जोरदार टीकास्त्र सोडले. अजित पवार यांनी तर महायुतीच्या तिन्ही घटक पक्षांचे चिन्ह सांगून त्या चिन्हावर बटन दाबून मतदान करण्याचे आवाहन केले.

ajit pawar
उद्या मंत्रिमंडळ विस्तार? अजित पवार यांचा दावा; दोन दिवसांच्या चर्चेत सूत्र निश्चित
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
IIT Mumbai to redesign Thane transport plan thane news
मुंबई आयआयटी करणार ठाण्याच्या वाहतुक आराखड्याची फेरआखणी; पुढील पाच वर्षांतील वाहतूक आव्हानांचा होणार अभ्यास
Devendra Fadnavis returns as Chief Minister and visits his hometown for first time at 3 pm Thursday
मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला १०० दिवसांचे लक्ष्य
Independent MLA Sharad Sonawane.
MLA Sharad Sonawane : अपक्ष आमदाराची महायुतीकडे मंत्रिपदाची मागणी, विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसत झळकावला फलक
Tanaji Sawant ON Mahayuti Government
Cabinet Expansion : मंत्रिमंडळात जुन्या नेत्यांना डावलून नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार? शिवसेना नेत्याचं मोठं विधान
no final decision on how many ministerial posts will be distributed to BJP Shiv Sena and NCP print politics news
मंत्र्यांच्या संख्येवरून महायुतीत चर्चा सुरूच
Chief Minister Devendra Fadnavis statement regarding the assurances given
उपमुख्यमंत्री असताना दिलेली हमी पूर्ण झाली नाही, आता मुख्यमंत्री झाल्यावर फडणवीस… 

हेही वाचा >>> Ajit Pawar : “बारामती विधानसभा अजित पवारच लढणार, दुसरं..”, प्रफुल्ल पटेल यांची घोषणा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या महामेळाव्यास येणार होते. परंतु आजारपणामुळे ते येऊ शकले नाहीत. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी स्वागत केले. यावेळी सुभाष देशमुख, विजयकुमार देशमुख, समाधान अवताडे, सचिन कल्याणशेट्टी, राम सातपुते, राजेंद्र राऊत या सर्व भाजप आमदारांची उपस्थिती होती.

सध्या नवरात्रोत्सवात शक्तिदेवीचा जागर होत असताना आपण समस्त स्त्रियांकडे शक्तिदेवीचे रूप म्हणून पाहतो. त्यांचा सन्मान राखण्यासाठी महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, लेक लाडकी योजना यासारख्या अनेक योजना आणल्या आहेत. परंतु विरोधकांना ते बघवत नाही. त्यांच्या पोटात दुखते, अशी टीका करीत अजित पवार म्हणाले, लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी मतदारांमध्ये महायुतीच्या विरोधात खोटा प्रचार करून दिशाभूल केल्यामुळे आम्हाला फटका बसला. परंतु आता विधानसभा निवडणुकीत मतदारांकडून चुकीची दुरुस्ती होईल. लाडकी बहीण योजना यापुढे चालू ठेवायची की बंद करायची, हे लाडक्या बहिणीच्या हातात आहे. विरोधकांना साथ दिल्यास लाडकी बहीण योजना बंद पडेल. ही योजना पुढे चालू ठेवायची असेल तर येत्या विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या मित्र पक्षातील भाजपचे कमळ, शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे धनुष्यबाण आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे घड्याळ या चिन्हांपैकी एक चिन्ह घेऊन जेथे उमेदवार असेल, चिन्हावर बटन दाबून महायुतीला साथ द्यावी आणि विरोधकांचा डाव आणून पाडावा, असे आवाहन त्यांनी केले.

हेही वाचा >>> जम्मू काश्मीर विधानसभा निवडणूक लोकशाहीच्या मजबुतीचे लक्षण; देवेंद्र फडणीस यांची प्रतिक्रिया

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसह अन्य लोक कल्याणकारी योजनांविषयी विरोधकांची नियत खराब आहे. म्हणूनच लाडकी बहीण योजनेचा वापर महिलांना आगामी विधानसभा निवडणुकीसाठी लाच देऊन मते विकत घेण्यात येत असल्याचा आरोप विरोधक करीत असल्याबद्दल संताप व्यक्त केला. आया बहिणीकडून मिळणाऱ्या प्रेमाचे कोणतेही मोल करता येत नाही. माय भगिनींचे दुःख विरोधकांना कळणार नाही. म्हणूनच राज्यात महाविकास आघाडी सत्तेवर आल्यास लाडक्या बहिणींची योजना रद्द करून टाकू, अशा वल्गना विरोधक करीत असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला. लाडकी बहीण योजनेसह अन्य योजना राज्याच्या आर्थिक हिताच्या नाहीत, त्या बंद कराव्यात म्हणून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि त्या पक्षाचे अन्य नेते विजय वडेट्टीवार यांच्या काही हस्तकांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याच्या घटनेकडेही त्यांनी लक्ष वेधले. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे सच्चे मावळे आहोत. तुमच्याच नावाने राज्याचा कारभार करीत आहोत. शिवछत्रपतींच्या विचारांनी रयतेचे राज्य आणण्यासाठी तुळजाभवानी मातेने जसे शिवछत्रपतींना आशीर्वाद दिले होते, असेच आशीर्वाद महायुती सरकारला द्यावेत, अशा शब्दात फडणवीस यांनी तुळजाभवानी मातेला साकडे घातले.

उपस्थिती, अनुपस्थितीची चर्चा

विशेष म्हणजे राष्ट्रवादी अजित पवार गट पुरस्कृत करमाळ्याचे अपक्ष आमदार संजय शिंदे व सध्या भाजपमध्ये नाराज मानले जाणारे पंढरपूरचे नेते, माजी आमदार प्रशांत परिचारक हेही या कार्यक्रमास उपस्थित होते. मात्र माढ्याचे आमदार बबनराव शिंदे, मोहोळचे आमदार यशवंत माने व नुकतीच राज्य सहकार परिषदेच्या अध्यक्षपदी वर्णी लागलेले तेथील अजितनिष्ठ नेते राजन पाटील-अनगरकर यांची अनुपस्थिती चर्चेची ठरली.

Story img Loader