बदली होऊनही कार्यमुक्त न झाल्याने जिल्हा परिषद सदस्य आक्रमक
निखिल मेस्त्री, लोकसत्ता
पालघर : जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत सदस्यांनी उपस्थित केलेल्या विविध मुद्दय़ांवरून वादात सापडलेल्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी संघरत्न खिलारे यांच्यावर जिल्हा परिषद सदस्यांनी पुन्हा आरोपाच्या फैरी झाडल्या.
पालघर जिल्हा परिषदेत सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी पदावर सध्या कार्यरत असलेल्या खिलारे यांनी २०१६ ते २०२० अशी पाच वर्षे एकटय़ा पालघर जिल्हा परिषदेत विविध विभागांत प्रमुख पदावर काम पाहिले आहे. याआधी त्या स्वच्छता आणि पाणी विभागात कार्यरत होत्या. समाज कल्याण विभागाचा अतिरिक्त कार्यभारही सांभाळला आहे. त्यानंतर त्यांची बदली पुन्हा पालघर जिल्हा परिषदेच्याच सामान्य प्रशासन विभागात झाली.
ही बदली त्यांनी स्वत:हून करवून घेत असल्याचे आरोप जिल्हा परिषद सदस्य करीत आहेत. खिलारे या जिल्हा परिषदेच्या स्वच्छता व पाणीपुरवठा तसेच समाजकल्याण विभागात काम करीत असताना त्यांच्यावर शासकीय निधी अपहार व अनियमिततेवरून सभेत प्रश्न उपस्थित करण्यात आले होते.
सभा आणि स्थायी समितीत सदस्यांनी उपस्थित केले आहेत. पाणीपुरवठा विभागातील भाडोत्री वाहन भाडे गैरव्यवहाराविषयी अनेक सवाल उपस्थित करण्यात आले होते.