शिवसेना ( शिंदे गट ) आमदार किशोर पाटील यांनी केलेल्या विधानानंतर चर्चांना उधाण आलं आहे. तांत्रिक अडचण आल्यास आम्ही भाजपाच्या चिन्हावर ( कमळ ) निवडणूक लढू, असं किशोर पाटील यांनी म्हटलं होतं. यावर विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तुम्ही कोणत्या चिन्हावर उभे राहता, याची आम्ही वाट पाहतोय, असं अंबादास दानवे म्हणाले.

किशोर पाटलांचं विधान काय?

किशोर पाटलांनी म्हटलं, “महाराष्ट्रात ‘धनुष्यबाण’ आणि ‘शिवसेना’ आमचीच असल्याचं सिद्ध झालं आहे. त्यामुळे ९९.९ टक्के भाजपाच्या निवडणूक चिन्हावर निवडणूक लढण्याची आमच्यावर वेळ येणार नाही. पण, जर तांत्रिक अडचण निर्माण झाली, तर कदाचित तसा निर्णय होऊ शकतो.”

uddhav thackeray criticized amit shah
“गद्दारांनी गुवाहाटीचा डोंगर बघितला, आता त्यांना टकमक टोक दाखवायचंय”, उद्धव ठाकरेंची शहाजीबापू पाटलांवर घणाघाती टीका!
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Amit Shah on Uddhav Thackeray
Amit Shah : “उद्धव ठाकरे तुमच्यात दम असेल तर…”, अमित शाहांचं भर सभेत खुलं आव्हान, म्हणाले…
Prashant Bamb BJP MLA
“मरेपर्यंत पस्तावशील, हे लोक तुला…”, भाजपा आमदाराची भर सभेत अरेरावी; प्रश्न विचारणाऱ्यांना कार्यकर्त्यांनी हुसकावलं
Uddhav Thackeray On Jay Shah :
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचं जय शाह यांना खुलं आव्हान; म्हणाले, “गावातील कोणत्याही तरुणाबरोबर क्रिकेट खेळून दाखवावं, मग…”
devendra fadnavis, public rally, nagpur west assembly constituency
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आम्ही पाकिस्तानमधून उमेदवार…”
amit shah slams uddhav thackeray in karad public meeting
बाळासाहेबांनी कमावलेले सर्व उद्धव ठाकरेंनी गमावले; अमित शहा यांचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Narendra Modi (4)
“…तर मी या निवडणुकीतून माघार घ्यायला तयार आहे”; उद्धव ठाकरेंचे पंतप्रधान मोदींना आव्हान!

हेही वाचा : “अजित पवार आमच्या पक्षात आहेत, पण…”, जयंत पाटलांचं विधान

“एकनाथ शिंदे यांनी जर उद्या सांगितलं की, आपल्या सर्वांना अपक्ष निवडणूक लढायची आहे, तर आम्ही अपक्ष निवडणूक लढवू. एकनाथ शिंदेंनी सांगितलं की, आपल्याला भाजपाकडून लढायचं आहे, तर आम्ही भाजपाकडून लढू. आमचे सर्व निर्णय आमचे सर्वेसर्वा एकनाथ शिंदे घेतील. ते जसं सांगतील, तसंच सगळं होईल”, असेही किशोर पाटील म्हणाले.

हेही वाचा : संजय राऊतांच्या “संभ्रम फार काळ राहता कामा नये” विधानावर शरद पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले…

“कोणत्याही चिन्हावर उभे राहिला, तरी…”

किशोर पाटलांच्या वक्तव्यावर अंबादास दानवे यांनी म्हटलं, “चिन्ह नाही मिळालं, तर भाजपाच्या चिन्हावर लढावे लागणार असल्याचं आमदारांनी सांगितलं. भाजपालाही हेच अपेक्षित आहे. तुम्ही कोणत्या चिन्हावर उभे राहता, याची आम्ही वाट पाहतोय. मात्र, कोणत्याही चिन्हावर उभे राहिला, तरी घरी पाठवण्याचा संकल्प शिवसैनिकांनी केला आहे.”