अलिबागमधील दत्ताजीराव खानविलकर एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष अमर वार्डे यांना इंडियन सॉलिडॅरिटी कौन्सिल आणि इंटरनॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ एज्युकेशन अॅण्ड मॅनेजमेंट अशा दिल्लीतील दोन संस्थांकडून ज्युवेल ऑफ इंडिया तसेच विजयरत्न गोल्ड मेडल व सर्टििफकेट ऑफ एक्सलन्स या दोन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी त्यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
अमर वार्डे हे १९८० पासून शिक्षणक्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. गेल्या ३५ वर्षांत त्यांनी जिल्ह्य़ातील विविध शैक्षणिक संस्थांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. वरसोली येथील आय.ई.एस. माध्यमिक विद्यालय सुरू करण्यात त्यांचा पुढाकार होता. जे.एस.एम. कॉलेज, अलिबाग येथील तांत्रिक विद्यालय या संस्थांवर त्यांनी काम केले आहे. नागोठणे येथील भारती एज्युकेशन सोसायटीचे ते सल्लागार आहेत. अलिबागेतील दत्ताजीराव खानविलकर एज्युकेशन ट्रस्टचे (डीकेईटी) अध्यक्ष असून मागील १३ वष्रे चिंतामणराव केळकर विद्यालय ते चालवीत आहेत. त्यांच्या या कामाची दखल घेऊन दोन्ही संस्थांनी त्यांना गौरविले आहे.
नवी दिल्ली येथील कृष्ण मेनन भवन येथे नुकत्याच झालेल्या पुरस्कार वितरण समारंभात अमर वार्डे यांना हे दोन्ही पुरस्कार प्रदान करण्यात आले. माजी केंद्रीय मंत्री आणि तामिळनाडूचे माजी राज्यपाल भीष्मनारायण सिंह यांच्या हस्ते अमर वार्डे यांना या दोन पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. पाँडेचरीचे माजी राज्यपाल वीरेंद्र कटारिया, सीबीआयचे माजी प्रमुख जोिगदर सिंग, ऑल इंडिया अॅडव्होकेटस् असोसिएशनचे अध्यक्ष ओ.पी. सक्सेना हे या वेळी उपस्थित होते. शिक्षणक्षेत्र, आरोग्य आणि आíथक विकास या क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना हे पुरस्कार दिले जातात.
अमर वार्डे ज्युवेल ऑफ इंडिया पुरस्काराने सन्मानित
शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी त्यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
Written by लोकसत्ता टीम
Updated:
First published on: 25-12-2015 at 00:03 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amar warde got jewel of india award