Tech Industry Layoff: गेल्या वर्षभरामध्ये अनेक आघाडीच्या कंपन्यांनी आपल्या हजारो कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. यामध्ये Twitter, Meta आणि Microsoft आदी आघाडीच्या कंपन्यांचा समावेश आहे. याची झळ या कंपन्यांच्या भारतातील कर्मचाऱ्यांनाही आता बसू लागली आहे. १८ जानेवारी २०२३ पासून तब्बल १८ हजार कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करणार असल्याचे Amazon ने अलीकडेच जाहीर केले होते. अनिश्चित अर्थव्यवस्थेमुळे हे करावे लागत असल्याचे कंपनीचे म्हणणे होते. त्यामुळे नोकरीवर संक्रांत येणे कर्मचाऱ्यांना तसे अपेक्षित असले तरी ते ज्या पद्धतीने घडते आहे, ते सारे कर्मचाऱ्यांसाठी धक्कादायकच आहे!

अ‍ॅमेझॉनच्या वरिष्ठ व्यवस्थापनाने कर्मचाऱ्यांना इमेल करून त्यांना तातडीच्या मीटिंगसाठी कार्यालयात बोलावून घेतले. या मेलमध्ये रिपोर्टींगसाठी ऑफिसमध्ये उपस्थित राहणे आवश्यक आहे असे लिहिण्यात आले होते, मात्र मीटिंगचा विषय काय आहे, याबाबत त्यात कोणताही उल्लेख नव्हता. अनेक कमर्चारी सध्या घरून म्हणजेच वर्क फ्रॉम होम करत आहेत. त्यांनादेखील ते आहेत त्या ठिकाणाहून तातडीने या मीटिंगसाठी पाचारण करण्यात आले. मीटिंगला उपस्थित राहण्यासाठी कर्मचाऱ्यांनी तातडीच्या विमानाने यावे असे तसेच त्यांचा विमानखर्च व राहण्याचा खर्च कंपनी करेल असे या इमेलमध्ये म्हटले होते, नाव उघड न करण्याच्या अटीवर एका कर्मचाऱ्याने ‘इंडिया टुडे टेक’ला अशी माहिती दिली.

ST buses Amravati scrap , passengers Amravati ST bus,
अमरावतीत १४९ एसटी बसेस भंगारात; कमतरतेमुळे प्रवाशांचे हाल
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Sudhir Mehta expressed his opinion regarding Pune Airport Pune news
‘पुणे विमानतळाचा व्यावसायिकदृष्ट्या विस्तार महत्त्वाचा’,कोणी केली मागणी ?
Pimpri, entrepreneur , LBT ,
पिंपरी : उद्योजकांमागे ‘एलबीटी’चे शुक्लकाष्ट, महापालिकेकडून ७२ हजार व्यापाऱ्यांना नोटिसा
Bigg Boss 18 Shilpa Shirodkar Evicted From Salman Khan Show
Bigg Boss 18: महाअंतिम सोहळ्याच्या चार दिवसाआधी झालं मिड वीक एविक्शन, ‘ही’ मराठमोळी सदस्य झाली घराबाहेर
Chandrapur, bribe, police sub-inspector,
चंद्रपूर : ५० हजाराची लाच, पोलीस उपनिरीक्षक प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात
selection process for next chief election commissioner
अन्वयार्थ : सरकारी खातेच जणू…
बारामतीत कार्यक्रमाच्या निमंत्रणावरून नाराजी नाट्य; खासदार सुप्रिया सुळे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

हेही वाचा : Tech Layoff : ShareChat ते Byju’s पर्यंत ‘या’ कंपन्यांनी केली कर्मचाऱ्यांची कपात; काय आहे कारण

मीटिंगच्या दिवशी प्रत्येक कर्मचाऱ्याची वरिष्ठ व्यवस्थापक आणि एचआर यांच्यासोबत वन- टू- वन मीटिंग झाली. याच मीटिंगमध्ये त्यांना कामावरून कमी करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली. कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केल्याची नुकसानभरपाई म्हणून मिळणारी रक्कम आणि इतर फायदे याची कल्पना देण्यात आली. आणि कंपनीशी संबंधित सर्व कामांचे त्यांचे अधिकार चार तासांनंतर काढून घेण्यात येतील, असे सांगण्यात आले. त्यांना त्यांची सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी केवळ चार तासांचा अवधी देण्यात आला, हे सारेच कर्मचाऱ्यांसाठी अतिशय धक्कादायक होते.

हेही वाचा : बड्या ‘टेक’ कंपन्या इतकी घाऊक कर्मचारी कपात करतात, हे लक्षण कशाचं?

‘इंडिया टुडे’ने दिलेल्या माहितीनुसार, कामावरून कमी करण्यात येणाऱ्या कर्मचाऱ्यांना अ‍ॅमेझॉनने ५ महिन्यांचा पगार देण्याचे वचन दिले होते. ट्वीटरमध्ये तर याहून अधिक धक्कादायक पद्धतीने निर्णय घेण्यात आले. तेथील कर्मचारी अद्याप पगार आणि नुकसानभरपाई मिळण्याची वाट पाहात आहेत. ट्विटर इंडियाच्या एका माजी कर्मचाऱ्याने ट्विटरच्या बॉसकडे म्हणजेच एलॉन मस्क यांच्याकडे पगार वेळेत देण्याची मागणी केली होती असे त्याने सांगितले. ट्विटरने भारतातील कपात झालेल्या कर्मचाऱ्यांना दोन महिन्यांचा पगार अलीकडेच दिला आहे.

हेही वाचा : Spotify Layoff: Spotify करणार पुन्हा कर्मचाऱ्यांची कपात, जाणून घ्या काय आहे प्रकरण ?

Amazon, Twitter मधून नोकरी गमावलेल्या कर्मचाऱ्यांनी आपण नोकरीच्या शोधात असल्याची माहिती LinkedIn वर पोस्ट केली आहे. दरम्यान, अनेक कंपन्यांनी आता पूर्णवेळ कर्मचारी भरती थांबवत असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे नोकरी गेलेल्या कर्मचाऱ्यांसाठी हे गंडांतरच ठरणार की, काय, अशी चर्चा सध्या सुरू आहे.

Story img Loader