Ambadas Danave on Vidhansabha Election Result 2024 : राज्यात विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय. आगामी निवडणुकीत स्वतंत्र लढण्याचे संकेतही शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षातील काही नेत्यांनी दिले. त्यानंतर आता विधान परिषदेचे आमदार अंबादास दानवे यांनी थेट काँग्रेसवर टीका केली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसचा अतिआत्मविश्वास नडला असं अंबादास दानवे म्हणाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अंबादास दानवे म्हणाले, “लोकसभा जिंकल्यानंतर काँग्रेसच्या मनात जास्त आत्मविश्वास आला असावा. जम्मू काश्मीर, हरियाणा आणि महाराष्ट्रात काँग्रेस जिंकू शकत होती, अशी स्थिती होती.”

दरम्यान, मुख्यमंत्री पदाचा चेहरा जनतेसमोर आणावा अशी भूमिका शिवसेनेने (उद्धव ठाकरे) यांनी आधापासूनच घेतली होती. संजय राऊतांनी ही भूमिका वेळोवेळी बोलूनही दाखवली. परंतु, या भूमिकेला काँग्रेस आणि राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाने विरोध केला. त्यांनी मुख्यमंत्री पदाचा चेहरा समोर न ठेवता विधानसभा निवडणूक लढवली. मुख्यमंत्री पदाबाबत विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर ठरवलं जाईल, असं महाविकास आघाडीचं ठरलं. मात्र, याच सुत्रामुळे महाविकास आघाडीला मोठ्या मताधिक्क्याने पराभव स्वीकारावा लागला असं मत अंबादास दानवेंनी व्यक्त केलंय.

ते म्हणाले, “कोणतं खातं मिळावं याकरता काँग्रेस चर्चा करत होते. मुख्यमंत्री पदासाठी १० जण इच्छुक होते हे सत्य आहे. मला असं वाटतं उद्धव ठाकरेंचं नाव मुख्यमंत्री म्हणून पुढे आलं असतं तर २-५ टक्के जास्त मते मिळाली असती.”

हेही वाचा >> Sharad Pawar : “शरद पवारांनी कायमचं घरी बसावं, त्यांनी अनेकांचं वाटोळं केलंय”, भाजपाच्या ज्येष्ठ नेत्याची बोचरी टीका

u

महाविकास आघाडी स्वतंत्र लढणार?

विधानसभा निवडणुकीत ९५ जागा लढवून केवळ २० ठिकाणी विजय झाल्यानंतर शिवसेना (ठाकरे) पक्षातील नेत्यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची भाषा सुरू केली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्वतंत्र निवडणुका लढवण्याचा त्यांचा आग्रह आहे. ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी आगामी निवडणुका स्वतंत्र लढण्याचा सूर असल्याचे सांगितले. यावर आता संजय राऊत यांनी सविस्तर भूमिका व्यक्त केली आहे. पराभव होताच मविआमधून बाहेर पडण्याचा काही जणांनी सूर आळवला असला तरी ही निवडक कार्यकर्त्यांची भावना आहे. पक्षाने असा कोणताही निर्णय घेतलेला नाही, असे संजय राऊत म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ambadas danave critisice congress over maharashtra assembly election result 2024 sgk