Ambadas Danve Protest for Women’s safety in Sambhaji Nagar : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांचा युक्रेन दौरा आटपून मायदेशी परतले आहेत. आता ते थेट महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. जळगावात मोदींच्या उपस्थितीत लखपती दीदी योजनेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात राज्यातील ११ लाख महिलांना प्रमाणपत्रं दिली जाणार आहेत. यापैकी काही महिलांना मोदींच्या हस्ते प्रमाणपत्र दिली जातील. मोदी विमानाने छत्रपती संभाजीनगर विमानतळावर उतरतील. तिथून ते जळगावला जाणार आहेत. दरम्यान, महाराष्ट्रातील व देशातील महिलांवरील अत्याचाराच्या घटनांकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं लक्ष वेधून घेण्यासाठी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीने आंदोलन सुरू केलं आहे. याअंतर्गत मविआ कार्यकर्त्यांनी छत्रपती संभाजीनगर विमानतळाबाहेर निषेध आंदोलन केलं. मात्र, पोलिसांनी अंबादास दानवे आणि मविआ कार्यकर्त्यांना ताब्यात घेत हे आंदोलन थांबवलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी छत्रपती संभाजी नगर येथे अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली निषेध आंदोलन केलं. मात्र पोलिसांनी दानवे यांच्यासह महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे. हे कार्यकर्ते विमानतळ परिसरात दाखल झाले होते. यापैकी बहुसंख्य कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून उर्वरित कार्यकर्त्यांची धरपकड चालू आहे. महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी विमानतळाबाहेर मानवी साखळी तयार केली होती. तसेच अनेकांच्या हातात बदलापूरमधील घटनेचा निषेध नोंदवणारे पोस्टर्स होते. काळे कपडे परिधान करून हे आंदोलक विमानतळाबाहेर उभे ठाकले होते. मात्र पोलीस आता आंदोलकांना तिथून घेऊन गेले आहेत.

मविआचं राज्य व केंद्र सरकारविरोधात आंदोलन

राज्यात व देशात घडणाऱ्या महिलांवरील अत्याचाराच्या घटनांकडे मोदी यांचं लक्ष वेधून घेण्यासाठी दानवे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन चालू होतं. दानवे यांनी म्हटलं होतं की “आम्ही कोणतंही भाष्य करणार नाही, आम्ही केवळ निषेध नोंदवणार आहोत. आम्हाला केवळ या गंभीर समस्येकडे पंतप्रधानांचं लक्ष वेधून घ्यायचं आहे”. मात्र आता पोलिसांनी सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं असून हे आंदोलन थांबलं आहे.

हे ही वाचा >> Rahul Gandhi : “मिस इंडियाच्या यादीत एकही दलित-ओबीसी नाही, यावरून…”, राहुल गांधींचं वक्तव्य

आंदोलन रोखण्यात पोलिसांना यश

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात येत आहेत. ११ लाख लखपती दिदींना आज येथे प्रमाणपत्रं वाटली जाणार आहेत. यासाठी जळगावत भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांना राज्यातील गंभीर घटनांची माहिती करून देण्यासाठी महाविकास आघाडीने हे आंदोलन पुकारलं होतं, जे थांबवण्यात पोलिसांना यश आलं आहे.