Ambadas Danve On Chhagan Bhujbal Devendra Fadnavis Meet: राज्यात महायुतीचं सरकार स्थापन होऊन आज जवळपास २० दिवस झाले आहेत. मात्र, तरीही महायुतीमधील काही नेत्यांमध्ये अद्यापही रुसवे-फुगवे सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. कारण महायुती सरकारच्या मंत्रिमंडळातून अनेक दिग्गज नेत्यांना डावलण्यात आलं आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते छगन भुजबळ यांनाही मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलेलं नाही. त्यामुळे छगन भुजबळ नाराज असून त्यांनी आपली नाराजी जाहीरपणे बोलून दाखवली. एवढंच नाही तर मंत्रिपद न मिळाल्यानंतर छगन भुजबळांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर अप्रत्यक्ष टीका करत नाराजीही व्यक्त केली. त्यानंतर जहाँ नहीं चैना, वहा नहीं रहना, असं सूचक विधानही भुजबळांनी केलं होतं. त्यामुळे छगन भुजबळ हे काही मोठा निर्णय घेतात का? याबाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहेत.

अशातच छगन भुजबळ यांनी सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेत तब्बल अर्धा तास चर्चा केली. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. या भेटीत काय चर्चा झाली? काही राजकीय चर्चा झाली का? याबाबत आता तर्कवितर्क लावले जात आहेत. मात्र, आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ यांच्या भेटीवर राजकीय नेत्यांकडून प्रतिक्रिया येत आहेत. आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी भुजबळांच्या नाराजीवर भाष्य करत काही सवाल उपस्थित केले आहेत. “भुजबळ फडणवीसांना भेटायला जातात, पण अजित पवार भुजबळांना भेटत नाहीत, याचा अर्थ काय?”, असा सवाल अंबादास दानवे यांनी उपस्थित केला आहे.

dhananjay munde valmik karad
Dhananjay Munde: “हे घ्या धनंजय मुंडे-वाल्मिक कराड यांच्यातील संबंधाचे धडधडीत पुरावे”, अंजली दमानियांनी सातबारेच केले शेअर!
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
Devendra Fadnavis and rahul gandhi (1)
Devendra Fadnavis : “काँग्रेसकडून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने राजकारण, भारतरत्नही…”, देवेंद्र फडणवीसांची टीका!
Ladki Bahin Yojana
Maharashtra News Updates : लाडकी बहिण योजनेसंदर्भात आदिती तटकरे यांनी दिली महत्वाची अपडेट…
Photo Of MLA Sanjay Kelkar.
BJP MLA : “मी लायक वाटलो नसेन…” मंत्रिपद न मिळाल्याने भाजपा आमदाराची खदखद
Suresh Dhas News
Suresh Dhas : संतोष देशमुख हत्या प्रकरण; सुरेश धस म्हणाले, “बीडमध्ये गँग्ज ऑफ वासेपूर सुरु आहे, आका…”
devendra fadnavis on amit thackeray
अमित ठाकरेंच्या उमेदवारीवर देवेंद्र फडणवीस म्हणतात, “राज ठाकरेंनी या एका जागेवर…”
Devendra Fadnavis On Beed District Guardian Minister
Devendra Fadnavis : बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान; म्हणाले, “आम्ही मिळून…”

हेही वाचा : “हे घ्या धनंजय मुंडे-वाल्मिक कराड यांच्यातील संबंधाचे धडधडीत पुरावे”, अंजली दमानियांनी सातबारेच केले शेअर!

अंबादास दानवे काय म्हणाले?

“छगन भुजबळ हे अजित पवार यांच्यावर नाराज आहेत. मग भुजबळ हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटतात. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार हे छगन भुजबळ यांना भेटत नाहीत. मग यामधून राजकीय अर्थ काय घ्यायचा? आता मागच्या काही काळात असं म्हटलं जात होतं की, देवेंद्र फडणवीस यांनीच छगन भुजबळ यांना आंदोलने करायला लावले. आता ते सत्य होतं, हे समोर येत आहे. न जाणो, छगन भुजबळ आणखी काही पावलं उचलतील. असं एका दिवसांत कोणती पावलं उचलता येत नसतात. त्यासाठी थोडं थांबावं लागतं. आणखी ८ दिवस, १० दिवस किंवा एक महिना. सर्व गोष्टी एका क्षणात स्पष्ट होत नसतात?”, असं सूचक भाष्य अंबादास दानवे यांनी माध्यमांशी बोलताना केलं.

भुजबळ-फडणवीसांच्या भेटीवर अजित पवारांनी काय म्हटलं होतं?

छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सोमवारी भेट घेतली. त्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. तसेच याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना प्रश्न विचारण्यात आला असता अजित पवार म्हणाले की, “आमचा हा पक्षांतर्गतला प्रश्न आहे. आम्ही आमच्या पद्धतीने सोडवू”, अशी एका वाक्यात प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली होती.

Story img Loader