Ambadas Danve On Chhagan Bhujbal Devendra Fadnavis Meet: राज्यात महायुतीचं सरकार स्थापन होऊन आज जवळपास २० दिवस झाले आहेत. मात्र, तरीही महायुतीमधील काही नेत्यांमध्ये अद्यापही रुसवे-फुगवे सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. कारण महायुती सरकारच्या मंत्रिमंडळातून अनेक दिग्गज नेत्यांना डावलण्यात आलं आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते छगन भुजबळ यांनाही मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलेलं नाही. त्यामुळे छगन भुजबळ नाराज असून त्यांनी आपली नाराजी जाहीरपणे बोलून दाखवली. एवढंच नाही तर मंत्रिपद न मिळाल्यानंतर छगन भुजबळांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर अप्रत्यक्ष टीका करत नाराजीही व्यक्त केली. त्यानंतर जहाँ नहीं चैना, वहा नहीं रहना, असं सूचक विधानही भुजबळांनी केलं होतं. त्यामुळे छगन भुजबळ हे काही मोठा निर्णय घेतात का? याबाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा