डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्तार दिनानिमित्त विद्यापीठाच्या गेटजवळ आयोजित केंद्रीय मंत्री आणि रिपाइचे नेते रामदास आठवले यांच्या सभेत आंबेडकरी कार्यकर्त्यांनीच गोंधळ घातल्याचे वृत्त आहे. कार्यकर्त्यांनी येथे खुर्च्यांची फेकाफेक करीत घोषणाबाजी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सुत्रांच्या माहितीनुसार, सभेच्या ठिकाणी आठवले व्यासपीठावर येताच भाषणापूर्वीच आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करायला सुरुवात केली आणि मैदानातील खुर्च्यांची फेकाफेक केली. दरम्यान, त्याठिकाणी उपस्थित पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण आणले. त्यानंतर सभा सुरु होण्यापूर्वीच लोक सभास्थळावरुन निघून जात होते.

गेल्या वर्षी याच दिवशी आठवलेंच्या सभेचे येथे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळीही आंबेडकरी कार्यकर्त्यांनी आठवलेंची सभा उधळण्याचा प्रयत्न केला होता. भीमा कोरेगाव हिंसाचार हे त्यामागील कारण होते.