मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्यापाठोपाठ शिवसेना खासदार संजय राऊत हे सक्तवसुली संचालनालयाचे (ईडी) लक्ष्य ठरले आहेत. गोरेगाव येथील पत्राचाळ गैरव्यवहारप्रकरणी ‘ईडी’ने संजय राऊत यांच्या पत्नी वर्षां राऊत, गुरू आशिष कन्स्ट्रक्शन प्रा. लिमिटेडचे माजी संचालक प्रवीण राऊत आणि स्वप्ना पाटकर यांच्याशी संबंधित ११ कोटी रुपयांच्या मालमत्तांवर मंगळवारी टाच आणली. राज्याच्या राजकारणामध्ये मागील काही दिवसांपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या गुढीपाडवा मेळाव्यातील भाषणावरुन राजकारण तापलेलं असतानाच आता या नव्या मुद्द्यावरुनही सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आलेत. अशाचत आता मनसेचे नेते अमेय खोपकर यांनी दोन्ही गोष्टींचा संदर्भ जोडत खोचक शब्दांमध्ये टीका केलीय.

नक्की वाचा >> विश्लेषण : राऊतांच्या संपत्तीवर जप्ती आणणारं १०३९ कोटींचं पत्राचाळ प्रकरण नेमकं काय? कोणी आणि कसा वळवला पैसा?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सकाळी नऊच्या सुमारास अमेय खोपकर यांनी संजय राऊतांचा थेट उल्लेख टाळत एक ट्विट केलंय. “मशिदींच्या भोंग्यावर कारवाई करायला सांगितले होते, ईडीने थेट राष्ट्रवादीच्या भोंग्यावरच कारवाई केली,” असं खोपकर यांनी म्हटलंय. कालच राऊत यांच्या संपत्तीवर ईडीने टाच आणली असून त्यावर उपहासात्मक पद्धतीने खोपकर यांनी हा टोला लगावलाय.

नक्की पाहा हे फोटो >> Photos: BJP युपीसहीत एकूण १८ राज्यांमध्ये सत्तेत पण एकाही राज्यात भोंग्यांवर बंदी नाही; गुजरातमध्ये तर न्यायालयाने…

राज ठाकरेंनी मशिदींवरील भोंगे काढण्याचं आवाहन करत तसं न झाल्यास आम्ही मशिदींसमोर भोंग्यांवर हनुमान चालीसा लावू असं म्हटलं होतं. त्याचाच संदर्भ देत शिवसेनेचे प्रवक्ते असणाऱ्या संजय राऊतांना खोपकर यांनी राष्ट्रवादीचा भोंगा असं थेट उल्लेख न करता म्हटलंय.

नक्की वाचा >> पुण्यातील मनसे शहराध्यक्षांचा राज यांना घरचा आहेर; भोंगे लावण्यास नकार देत म्हणाले, “राजसाहेबांचं भाषण कळलंच नाही, आम्ही…”

राष्ट्रवादीने राऊतांविरोधातील कारवाईवर काय म्हटलंय?
राज्यामध्ये शिवसेनेसोबत सत्तेत असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे या प्रकरणी पहिली प्रतिक्रिया देत भाजपावर निशाणा साधालाय. भाजपाकडे महाविकासआघाडीतील नेत्यांना सूडाच्या राजकारणाअंतर्गत लक्ष्य केलं जात असल्याचं राष्ट्रवादीने म्हटलंय. या कारवाईसंदर्भात राष्ट्रवादीची भूमिका मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी मांडलीय.

नक्की वाचा >> ‘हर हर ईडी, घर घर ईडी’ म्हणत राऊतांवरील कारवाईच्या दुसऱ्याच दिवशी शिवसेनेचा हल्लाबोल; “मोदींची सगळ्यात जास्त बेइज्जती…”

“महाविकास आघाडी सरकारची अजून एक मुलुख मैदानी तोफ संजय राऊत यांची सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) जप्त केली असं ऐकलं. हे काय चाललं आहे? हे सूडाचं राजकारण महाराष्ट्रात सुरु आहे,” असं तापसे म्हणालेत. “२०१९ मध्ये राज्यात सरकार न बनवून शकलेली भाजपा सूडाच्या राजकारणाच्या माध्यमातून महाविकासचे आघाडी जे बलस्थान आहेत, शक्तीशाली नेते आहेत त्यांना टप्प्याटप्याने लक्ष्य करण्याचं काम करत आहे,” असा आरोप तापसेंनी केलाय.

नक्की वाचा >> ED ची राऊतांविरोधात कारवाई : निलेश राणे म्हणतात, “राऊतच कशाला उद्या उद्धव ठाकरेंवरही…”

“जे संजय राऊत महाविकास आघाडीबद्दल बोलत होते, भाजपाविरोधात बोलत होते, त्यांच्यावर ही कारवाई झाली त्यांचं राहतं घर जप्त करण्यात आलं.
अशापद्धतीचं सुडाचं राजकारण ईडीच्या माध्यमातून करण्यात आलं. कालच ईडी आणि मध्यस्थी करणाऱ्या व्यक्तीसंदर्भात संजय राऊतांनी तक्रार दिलेली. त्यासंदर्भात गृहमंत्र्यांनी एसआयटीची चौकशी लावली. ही चौकशी लागली रे लागली की ईडीचे त्यांच्यावर कारवाई केली त्यांचं राहतं घर जप्त केलं. याचा अर्थ स्पष्ट आहे, हे महाविकास आघाडीला बदनाम करायचं. महाविकास आघाडी सरकारविरोधात सूडाचं राजकारण करायचं अशापद्धतीने भारतीय जनाता पर्टी करत आहे. ही गोष्ट लोकशाहीच्या दृष्टीकोनातून योग्य नाही,” असं तापसे म्हणालेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amey khopkar tweet saying ask to take action against mosque loudspeakers ed took action against ncp loudspeaker scsg
Show comments