काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील सुरु असलेली ‘भारत जोडो यात्रा’ नांदेड जिल्ह्यात सुरु आहे. महाराष्ट्रात १४ दिवस ‘भारत जोडो यात्रा’ प्रवास करणार आहे. या यात्रेत महाराष्ट्रातील काँग्रेसचे सर्व नेते पदायात्रेत सहभागी झाले आहेत. तर, माजी मंत्री अमित देशमुख आणि आमदार धीरज देशमुख पदयात्रेत हजर न राहिल्याने तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘भारत जोडो यात्रा’ ही कन्याकुमारी ते कश्मीरपर्यंत निघाली आहे. यात्रेत राज्यातीलच नव्हे तर देशातील वेगवेगळ्या पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नेते सहभागी होत आहे. मात्र, अमित देशमुख आणि धीरज देशमुख हे अद्यापही ‘भारत जोडो यात्रे’त सहभागी झाले नाहीत. त्यातच काही दिवसांपूर्वी वंचित आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या एका विधानाची चर्चा होत आहे. मात्र, यावर आता काँग्रेसचे नेते राजू वाघमारे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

हेही वाचा : “मोदी-शाहांना भेटणार,” संजय राऊतांच्या विधानावर उद्धव ठाकरे थेट बोलले; म्हणाले “मांडवली…”

“या चर्चा पूर्णपणे निरर्थक आहेत. नांदेडनंतर ‘भारत जोडो यात्रा’ ११ नोव्हेंबरला हिंगोलीत प्रवेश करणार आहे. हिंगोलीची जबाबदारी अमित देशमुख यांच्याकडे असल्याने धीरज देशमुखही त्यांची मदत करत आहेत. त्यामुळेच ते नांदेडमधील यात्रेत सहभागी झाले नाहीत. अशी भाकीत भाजपा काही जणांच्या तोंडातून वधवत असून, असे काही होणार नाही. काँग्रेस एकसंघ असून, खंबीरपणे भाजपाला तोंड देण्यासाठी महाराष्ट्रात उभी आहे,” असे राजू वाघमारे यांनी स्पष्ट केलं.

हेही वाचा : “जग फिरून झालं असेल तर…”, राजू शेट्टींचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना खोचक टोला

प्रकाश आंबेडकर काय म्हणाले होते?

काही दिवसांपूर्वी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसवर टीका केली होती. “काँग्रेसचे आता काहीच शिल्लक राहिलेलं नाही. लातूरकर आणि नांदेडकर कधीही फडवणवीसांच्या मांडीवर जाऊन बसतील,” असा टोला प्रकाश आंबेडकर यांनी अशोक चव्हाण आणि अमित देशमुख यांचं नाव घेता लगावला होता.