Amit Shah Challenged Uddhav Thackeray : राज्यातील विधानसभा निवडणुकीला आता अवघे दहा दिवस उरले आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या प्रचाराला रंग चढलाय. आरोप-प्रत्यारोप अन् टीका-टिपण्यांना उत आलाय. यामध्येच अमित शाह निवडणुकीच्या निमित्ताने महाराष्ट्र दौऱ्यावर असून भाजपाचा आज जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. जाहीरनामा प्रसिद्ध केल्यानंतर ते जळगाव येथील रावेर विधानसभा मतदारसंघात प्रचाराकरता गेले. तिथे त्यांनी उद्धव ठाकरेंना थेट आव्हान दिलं आहे.

यंदाची विधानसभा निवडणूक महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी आहे. या दोन्ही आघाड्यांमधील सद्यस्थितील मित्रपक्ष कधीकाळी एकमेकांचे राजकीय शत्रू होते. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून राजकीय समीकरणे सातत्याने बदलत आहेत. त्यामुळे केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी उद्धव ठाकरेंना आव्हान दिलं आहे. अमित शाह म्हणाले, “१० नोव्हेंबरचा दिवस अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. आजचा दिवस महाराष्ट्र आणि संपूर्ण देश शिवप्रताप दिवस म्हणून साजरा केला जातो. याच दिवशी १६५९ मध्ये अफजल खानाचा वध करून भगवा फडकवण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. महाराष्ट्रात शिवाजी महाराजांच्या सिद्धांतावर चालणारं महायुतीचं सरकार आहे.”

What Raj Thackeray Said?
Raj Thackeray : ‘सत्तेत जायचा फॉर्म्युला काय?’ राज ठाकरे म्हणाले, “या निवडणुकीत..”
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
US Presidential Election Results 2024 Live Updates in Marathi| Donald Trump vs Kamala Harris Live
US Election Results 2024 Updates: निवडून येताच डोनाल्ड ट्रम्प यांचं टीकाकारांना उत्तर; म्हणाले, “मी युद्ध घडवून आणणार नाही, तर…”
Maharashtra Assembly Election 2024 Live Updates in Marathi
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर काँग्रेसमध्ये दोन गट? शाहू महाराज – सतेज पाटील यांच्यातील संबंधात कटुता?
Aditya Thackeray eknath shinde
Aditya Thackeray : “शिंदेंच्या दोन मंत्र्यांसह आठ जणांना परत यायचं होतं, पण…”, आदित्य ठाकरेंनी सांगितलं आठवडाभरापूर्वी ‘मातोश्री’वर काय घडलं
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
Donald Trump Won US Presidential Election 2024
Donald Trump Won US Election 2024: जागतिक महासत्तेच्या चाव्या पुन्हा डोनाल्ड ट्रम्प यांच्या ताब्यात; अमेरिकेत मोठ्या विजयासह सत्तारूढ होणार!
What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप; “धनंजय आणि पंकजा मुंडे या दोघांनी माझी जमीन लाटली, आणि..”

हेही वाचा >> महिलांना तीन हजार, मोफत बसप्रवास ते ५०० रुपयांत सहा गॅस सिलिंडर; मविआच्या जाहिरनाम्यात घोषणांचा पाऊस!

“आमच्यासमोर असलेल्या आघाडीचा एकद उद्देश आहे की ऐनकेनप्रकारे सत्ता प्राप्त करणे. भाजपा, शिवसेना, अजित पवारांची एनसीपीचा उद्देश आहे की शिवाजी महाराजांच्या सिद्धांतावरून महाराष्ट्र राज्य देशातील एक नंबर राज्य बनवायचं आहे. मी आघाडी वाल्यांना विचारू इच्छितो. काँग्रेस, शरद पवार आणि उद्धव ठाकरे तिन्ही पक्ष एकत्र लढत आहेत. हे राहुल बाबा आमच्या सावरकरांना विरोध करत आहेत. उद्धव ठाकरे तुमच्यात दम असेल तर राहुल गांधींना स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आणि बाळासाहेब ठाकरे यांच्याबाबत दोन चांगले शब्द बोलायला सांगा.”

रामलल्लाने दिवाळी भव्य मंदिरात साजरी केली

“काँग्रेस पक्षाने, शरद पवारांनी ७० वर्षे राम मंदिराला अडकवून ठेवलं होतं. २०१९ मध्ये मोदी पंतप्रधान बनल्यानंतर त्यांनी पाच वर्षांत केस जिंकली. राम मंदिर निर्माणही केलं आणि प्राणप्रतिष्ठाही केली. यावेळी साडेपाचशे वर्षांनंतर पहिल्यांदा रामलल्लाने दिवाळी भव्य मंदिरात साजरी केली”, असंही अमित शाह म्हणाले.