केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांनी अहमदनगर जिल्ह्यातील प्रवरानगर येथे भरलेल्या देशातील पहिल्या सहकार परिषदेत सहकार क्षेत्राविषयी आपली भूमिका स्पष्ट केली. तसेच मोदी सरकारने स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतर केंद्रात सहकार मंत्रालय का काढलं याचं कारण सांगितलं. याशिवाय अनेक सहकारी साखर कारखाने नंतर खासगी होतात असं म्हणत त्यांनी सहकारी साखर कारखाने विकत घेऊन खासगी करणाऱ्या नेत्यांवरही निशाणा साधला.

अमित शाह म्हणाले, “विठ्ठलराव विखे पाटलांनी दूरदृष्टीतून शेतकऱ्यांच्या विकासासाठी साखर कारखाना सुरू केला. हा साखर कारखाना आजही सहकारी पद्धतीने सुरू आहे याचा मला आनंद वाटतो. कारण अनेक सहकारी साखर कारखाने खासगी झाले आहेत. कमीत कमी एक साखर कारखाना जपून ठेवला आहे आणि तो व्यवस्थितपणे चालवत आहेत याचा मला खूप आनंद आहे. आपला प्रेरणा स्त्रोत जपला गेलाय.”

karjat loksatta news
कर्जत : व्यापाऱ्यावर चुकीच्या कारवाईच्या निषेधार्थ बाजार समितीचे लिलाव, सर्व व्यवहार बंद
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Kinetic Group president Arun Firodia Hinjewadi
हिंजवडी ‘आयटी पार्क’बाबत उद्योजक अरुण फिरोदिया यांची महत्वाची सूचना, म्हणाले…
Rajarambapu Patil Cooperative Sugar Factory will provide 2 5 lakh sugarcane seedlings to farmers
राजारामबापू कारखाना शेतकऱ्यांना २५ लाख ऊसरोपे पुरवणार
india sugar production declines by 2 million tonnes
देशांतर्गत साखर उत्पादनात २० लाख टनांची घट; घट ४० लाख टनांवर जाण्याची भीती
How much sugar has been produced in Maharashtra and how much will be produced Mumbai print news
राज्याने साखर उत्पादनाचा महत्त्वाचा टप्पा गाठला; जाणून घ्या, साखर उत्पादन किती झाले, किती होणार 
Same place for dry port and sugar company Meeting soon to resolve the dispute
शुष्क बंदर, साखर कंपनीसाठी एकच जागा; तिढा सोडविण्यासाठी लवकरच बैठक
mmrda to set up food plaza and fuel station at atal setu
अटल सेतूवर लवकरच फूड प्लाझा आणि पेट्रोल पंप

“प्रवरानगर सहकाराशी संबंधित प्रत्येक व्यक्तीसाठी सहकाराची काशी”

“महाराष्ट्राने सहकारी चळवळीत जे योगदान दिलंय त्याची आठवण करावी लागेल. १९२३ मध्ये लोणीत सहकारी पतपेढी तयार करण्यात आली. त्यानंतर सहकारी मिल तयार झाली. हे प्रवरानगर सहकाराशी संबंधित प्रत्येक व्यक्तीसाठी सहकाराची काशी आहे. प्रवरा साखर कारखान्याने अनेक कामं केली. चांगलं प्रशासन असेल तर वर्षानुवर्षे सहकारी संस्था कशा व्यवस्थित चालतात याचं हे उदाहरण आहे,” असं अमित शाह यांनी सांगितलं.

हेही वाचा : “सहकारी चळवळ धोक्यात आल्याचं सांगणारेच आता…”, देवेंद्र फडणवीसांचा अप्रत्यक्ष निशाणा! सहकार परिषदेतून खोचक टीका!

“सहकार मंत्रालयाची गरज काय असं विचारणाऱ्यांना उत्तर द्यायला मी आलोय”

अमित शाह म्हणाले, “स्वातंत्र्यानंतर ७५ वर्षांनी मोदी सरकारने पहिल्यांदा सहकार मंत्रालय स्थापन केलं. अनेकांनी विचारलं या मंत्रालयाची कालसुसंगतता काय आहे. सहकार मंत्रालयाची गरज काय असं विचारणाऱ्यांना उत्तर द्यायला मी आलोय. देशातील सहकारी साखर कारखान्यांमधून एकूण ३१ टक्के साखरेचं उत्पन्न होतं. हे देशात सर्वांना माहिती नाही. दुधाचं २० टक्के उत्पादन सहकार क्षेत्र करते. १३ टक्के गहू, २० टक्के तांदुळाची खरेदी सहकार क्षेत्र करतं. २५ टक्के खतांचं उत्पादन आणि वितरण दोन्ही सहकाराच्या माध्यमातून होतं.”

“सहकारी चळवळ धोक्यात आल्याचं सांगणारेच आता…”

अमित शाहांच्या उपस्थितीतच देवेंद्र फडणवीसांनी स्टेजवरून टोलेबाजी केली. “देशात नरेंद्र मोदींचं आणि महाराष्ट्रात आमचं सरकार आलं, तेव्हा लोक म्हणायचे की यांना सहकारमधलं काय कळतं? आता सहकारचं काय होणार? पण आमच्या सरकराने सहकारबाबत घेतलेले निर्णय सहकारला अडचणीतून बाहेर काढणारे ठरले”, असं देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

“माझा त्यांना सल्ला आहे की…”

दरम्यान, यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीसांनी राज्यातील सत्ताधाऱ्यांवर देखील अप्रत्यक्ष शब्दांमध्ये निशाणा साधला. “अनेक लोक सहकारी चळवळ धोक्यात आहे असं सांगतात. पण असे लोकच खासगी कारखाने काढून बसले आहेत आणि ते खासगी कारखान्यांचे मालक आहेत. सहकाराचे कारखाने खासगीत त्यांनी नेले आहेत आणि आता तेच शिकवतायत की सहकार चळवळ देखील अडचणीत आहे”, असं फडणवीस म्हणाले. “माझा त्यांना सल्ला आहे की जर सहकार चळवळ अडचणीत आहे, तर तुम्ही त्या चळवळीला मदत करा”, असं देखील त्यांनी नमूद केलं.

“कारखान्यांना मदत करण्याऐवजी ते कारखाने खासगीमध्ये कवडीमोलाच्या भावाने विकत घ्यायचे आणि त्याच कारखान्याच्या जमिनी कोट्यवधींना विकायच्या किंवा गहाण टाकायच्या आणि त्यातून पुन्हा कारखाने उभे करायचे हे शेतकऱ्यांच्या कारखान्यांना खासगी लोकांच्या घशात टाकण्याचं षडयंत्र चाललेलं आहे. हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि सहकार जगला पाहिजे”, असं ते म्हणाले.

Story img Loader