Amit Shah : महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक होण्यासाठी अवघ्या दहा दिवसांचा कालवाधी उरला आहे. २० नोव्हेंबरला राज्यात मतदान पार पडणार आहे तर २३ नोव्हेंबरला निकाल लागणार आहे. महाराष्ट्राच्या निवडणुकीनंतर सरकार कुणाचं येणार? याबाबत विविध अंदाज वर्तवले जात आहेत. महायुतीने पुन्हा आम्हीच येऊ असं म्हटलं आहे. तर महाविकास आघाडीने आमच्या १८० हून जास्त जागा येतील असा दावा केला आहे. प्रचाराची रणधुमाळी सुरु झाली आहे. दरम्यान महाराष्ट्रात भाजपाने जाहीरनामा जाहीर केला आहे. महाविकास आघाडी किंवा महायुती कुणीही मुख्यमंत्री जाहीर केलेला नाही. एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात आम्ही निवडणूक लढवू असं म्हटलं आहे. अमित शाह ( Amit Shah ) यांनी मुख्यमंत्री कोण होईल? या प्रश्नावर उत्तर दिलं.

महाराष्ट्राची निवडणूक सोपी नाही!

महाराष्ट्राची निवडणूक म्हणावी तितकी सोपी नाही. कारण यावेळी शिवेसनेची दोन शकलं झाली आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसची दोन शकलं झाली आहेत. त्यामुळे यंदा सहा पक्षांची लढाई एकमेकांच्या विरोधात रंगणार आहे. महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक यंदा सोपी नाही. कारण महायुती विरुद्ध महाविकास आघाडी थेट सामना आहे. दरम्यान भाजपाने जेव्हा जाहीरनामा जाहीर केला त्यानंतर महायुतीची सत्ता आल्यास मुख्यमंत्री कोण? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्याचं उत्तर अमित शाह ( Amit Shah ) यांनी दिलं आहे.

Sharad Pawar
Sharad Pawar : मविआचा मुख्यमंत्रिपदाबाबत काय निर्णय झालाय? शरद पवार सस्पेन्स मिटवत म्हणाले…
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
What Raj Thackeray Said?
Raj Thackeray : ‘सत्तेत जायचा फॉर्म्युला काय?’ राज ठाकरे म्हणाले, “या निवडणुकीत..”
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
US Presidential Election Results 2024 Live Updates in Marathi| Donald Trump vs Kamala Harris Live
US Election Results 2024 Updates: निवडून येताच डोनाल्ड ट्रम्प यांचं टीकाकारांना उत्तर; म्हणाले, “मी युद्ध घडवून आणणार नाही, तर…”
mahavikas aghadi release manifesto
महिलांना तीन हजार, मोफत बसप्रवास ते प्रत्येकी ५०० रुपयांत सहा गॅस सिलिंडर; मविआच्या जाहिरनाम्यात घोषणांचा पाऊस!
Sharad Pawar Dhananjay Munde
Sharad Pawar : “सत्ता फार लवकर डोक्यात गेली”, शरद पवारांचा धनंजय मुंडेंना टोला; म्हणाले, “अडचणींच्या काळात…”

हे पण वाचा- BJP Manifesto : भाजपाच्या जाहीरनाम्यात लाडक्या बहिणींना २१०० रुपये देण्याचं आश्वासन , शेतकऱ्यांना कर्जमाफीसह ‘या’ घोषणा

अमित शाह काय म्हणाले?

महायुतीचे सरकार आल्यानंतर आता धर्मांतरविरोधात कठोर कायदा करणार आहे, असे अमित शाह यांनी सांगितले. यावेळी त्यांनी काँग्रेसवर शेतकऱ्यांचे प्रश्न न सोडवल्याबाबत टीका केली, ते म्हणाले. काँग्रेस सरकार असताना शेतमालासाठी किमान आधारभूत किंमतीवर किती घेतला गेला. आता महायुती सरकार असताना किती घेतला गेला, त्याचा डाटा डाऊनलोड करुन पाहा. तसेच राज्यात सर्वाधिक जास्त दंगे आघाडीच्या सरकारमध्ये झाले आहेत. काँग्रेसच्या सरकारमध्ये झाले आहेत. संघावर बंदी आणण्याचे तीन वेळा प्रयत्न काँग्रेसने केले आहे. परंतु प्रत्येक वेळी संघ अधिक मजबूत होऊन पुढे आला आहे. आता तर काँग्रेसची सरकार येणार नाही? यामुळे हा प्रश्नच येत नाही. पूर्ण बहुमताने महायुतीचे सरकार येणार आहे, असे एका प्रश्नाच्या उत्तरात अमित शाह ( Amit Shah ) यांनी सांगितलं आहे.

महायुतीचं सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री कोण?

महायुतीचे सरकार आल्यावर मुख्यमंत्री कोण होणार? या प्रश्नावर अमित शाह म्हणाले, सध्या महायुतीचे नेतृत्व एकनाथ शिंदे करत आहेत. निवडणूक त्यांच्या नेतृत्वाखाली लढवली जात आहे. निवडणुकीनंतर मुख्यमंत्री कोण होणार? हे तिन्ही पक्षाचे नेते एकत्र बसून निर्णय घेणार आहेत, असं अमित शाह यांनी म्हटलंय. महायुतीची सत्ता आल्यावर तीन पक्षांची कमिटी तयार होणार आहे. ती कमिटी तिन्ही पक्षाचा संकल्पपत्राचा अभ्यास करुन ती लागू करण्याबाबत निर्णय घेणार आहे. असं अमित शाह ( Amit Shah ) यांनी स्पष्ट केलं.

Story img Loader