Amit Shah Praises Harshvardhan Patil For work in Cooperative Sector : केंद्रीय गृहमंत्री व सहकार मंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत नवी दिल्ली येथे साखर उद्योग परिसंवाद हा कार्यक्रम आज (शनिवार, १० ऑगस्ट) पार पडला. यावेळी राष्ट्रीय दक्षता पुरस्कार २०२२-२३ चं वितरणही करण्यात आलं. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे माजी सहकार मंत्री व भाजपा नेते हर्षवर्धन पाटील हे देखील उपस्थित होते. या कार्यक्रमाला संबोधित करताना अमित शाह यांनी देशाचं सहकार क्षेत्र कसं वाढत चाललं आहे. त्यामध्ये प्रामुख्याने साखर उद्योगाचा किती वाटा आहे, याबद्दलची माहिती दिली. देशभरात होणारं उसाचं व साखरेचं उत्पादन, त्याबरोबरचे इतर जोडधंदे आणि यातून होणारा सहकार क्षेत्राचा विकास सर्वांसमोर मांडला. यावेळी शाह यांनी हर्षवर्धन पाटील यांचं कौतुक केलं. महाराष्ट्रात होणारी इथेनॉल निर्मिती, केंद्राकडून त्याची होणारी खरेदी, याबाबत हर्षवर्धन पाटील सातत्याने पाठपुरावा करत असतात. असं शाह यांनी सांगितलं. शाह म्हणाले, तुम्हा सर्व साखर उत्पादकांचे ते (पाटील) नेते आणि वकील दोन्ही आहेत.
Amit Shah : “हर्षवर्धन नेहमी माझी कॉलर पकडून म्हणतो…”, अमित शाहांनी सांगितला किस्सा; म्हणाले, “हा तुमचा वकील…”
Amit Shah on Harshvardhan Patil : अमित शाह म्हणाले, देशातील इथेनॉलची निर्मिती १० पटींनी वाढली आहे.
Written by पॉलिटिकल न्यूज डेस्क
Updated:
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 10-08-2024 at 21:10 IST
© IE Online Media Services (P) Ltd
© IE Online Media Services (P) Ltd
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amit shah says harshvardhan patil always demands to buy their ethanol asc