‘‘हिंमत असेल तर मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्या आणि तिन्ही पक्षांनी एकत्र लढून भाजपशी दोन हात करा’’, असे आव्हान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना रविवारी पुण्यात दिले. विधानसभा निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार हे ठरले होते. मात्र सत्तेसाठी शिवसेनेने वचन मोडले. मुख्यमंत्रिपदासाठी हिंदुत्व सोडले अशी टीकाही अमित शाह यांनी म्हटले. त्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही शिवसेनेने हिंदुत्वाचा मुद्दा कधीही सोडला नाही आणि सोडणारही नाही असे म्हटले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“अमित शाह काल पुण्यात आले आणि त्यांचे जे काही वक्तव्य आहे संपूर्ण असत्याला धरून आहे. कालच्या संपूर्ण भाषणामध्ये अमित शाह नक्की खरं काय बोलले हे आम्ही शोधण्याचा प्रयत्न करत होतो. आमच्या सरकारविषयी आणि आमच्या हिंदुत्वाविषयी प्रश्न उपस्थित करुन महाराष्ट्राच्या आणि देशाच्या जनतेला गेल्या अडीच वर्षापासून भ्रमित करण्याचा प्रयत्न सुरु आहे. तरीही जनता विश्वास ठेवायला तयार नाही हे वैफल्य आम्ही राज्यातल्या नेत्यांकडे असल्याचे पाहत आहे. पण आता त्यांचे सर्वोच्च नेतेसुद्धा त्याच वैफल्यातून महाराष्ट्रात येऊन बोलू लागले आहेत. हे पाहिल्यानंतर आम्हाला त्यांची दया येते आणि आश्चर्यही वाटले,” असे अमित शाह यांनी म्हटले.

“गृहमंत्र्यांना देशात काम नसेल तर आम्हाला सांगा”; अमित शाहांच्या टीकेनंतर संजय राऊतांचे प्रत्युत्तर

“शिवसेनेने हिंदुत्वाचा मुद्दा कधीही सोडला नाही आणि सोडणारही नाही. फक्त सत्तेसाठी आमच्यासारख्या प्रखर हिंदुत्ववादी पक्षाला दूर करताना आणि सत्तेचा वाटा जास्त मिळावा यासाठी २०१४ साली शिवसेनेला दूर करा असे राज्यातला भाजपाच्या नेत्यांना खाजगीत सांगणारे कोण होते हे अमित शाह यांनी स्पष्ट करावे,” संजय राऊत म्हणाले.

“२०१४ सालीही ते वेगळे लढून दाखवा असे म्हटले होते. त्यावेळी आम्ही वेगळेच लढलो होतो. प्रचंड ताकद, पैसा, सत्ता याची लाट असून आम्ही महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली चांगल्या प्रकारे लढलो,” अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे.

संजय राऊत म्हणतात, “पेट्रोल-डिझेलचे दर ५० रुपयांनी कमी करायचे असतील तर…”

दरम्यान, सत्ता माझा जन्मसिद्ध अधिकार आहे, असे शिवसेनेला वाटत आहे. महागाईच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर टीका केली जात होती. त्यामुळे पेट्रोल-डिझेलचे दर कमी करण्याचा निर्णय केंद्राने घेतला. राज्यांनीही दर कमी करावेत, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले. मात्र महाविकास आघाडीने पेट्रोल-डिझेलऐवजी मद्य स्वस्त केले याचा जाब कार्यकर्त्यांनी विचारावा, असे शाह यांनी म्हटले होते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amit shah should explain who was telling bjp leaders to remove shiv sena in 2014 sanjay raut abn