पंतप्रधान मोदींनंतर आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. यादरम्यान त्यांच्याहस्ते विविध विकासकामांचे उद्धघाटन होणार आहे. यावेळी ते संघ मुख्यालयालाही भेट देणार आहेत. तसेच भाजपाच्या बैठकींनाही ते हजेरी लावतील. आगामी मुंबई महापालिकेची निवडणूक तसेच पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शाहांचा दौरा महत्त्वाचा मानला जातो आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – “एकनाथ शिंदे आता शिवसेनाप्रमुख”; निवडणूक आयोगाच्या निकालानंतर बच्चू कडूंची प्रतिक्रिया, उद्धव ठाकरेंनाही केलं लक्ष्य; म्हणाले, “घराणेशाही…”

असा असेल अमित शाहांचा महाराष्ट्र दौरा

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे १८ आणि १९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. आज (१८ फेब्रुवारी) सकाळी १०.३० वाजता ते दीक्षाभूमी येथील बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी जाणार आहेत. तसेच यावेळी ते संघ मुख्यालयाही भेट देणार आहेत. याबरोबच विविध विकासकामांचं उद्घाटनही अमित शाह यांच्या हस्ते होणार आहे.

अमित शाहांचा महाराष्ट्र दौरा पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणूक आणि आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा मानला जातो आहे. या दौऱ्यावेळी अमित शाह भाजपाच्या महत्त्वाच्या नेत्यांबरोबर बैठक घेणार आहेत. यावेळी ते पुण्यातील पोटनिवडणूक आणि मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपाच्या तयारीचा आढावा घेतील.

हेही वाचा – ‘चोर तो चोरच,’ म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदेंचे जशास तसे उत्तर; धनुष्यबाण चिन्ह मिळाल्यानंतर म्हणाले, “आता तरी…”

याबरोबच अमित शाह यांच्या हस्ते ‘मोदी ॲट ट्वेन्टी’ या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. तर १९ फेब्रुवारी रोजी अमित शाह बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आलेल्या शिवसृष्टीत आयोजित कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. ‘मोदी ॲट ट्वेन्टी’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यासाठी मोठा सार्वजनिक कार्यक्रम भाजपाकडून आयोजित करण्यात येणार आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amit shaha on two days maharashtra visit will published marathi book on pm modi spb
Show comments