Amol Khatal MLA From Sangamner : नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने राज्यात प्रचंड मोठे यश मिळवले आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या अनेकांना महायुतीच्या नवख्या उमेदवारांनी पराभवाचा धक्का दिला आहे. यामध्ये संगमनेरमधून शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे) अमोल खताळ यांनी काँग्रेसचे ८ वेळचे आमदार बाळासाहेब थोरात यांचा पराभव केला आहे. आता आज विधिमंडळांच्या विशेष अधिवेशनात नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी समारंभ होणार आहे. यावेळी संगमनेरचे आमदार अमोल खताळ विधिमंडळ परिसरात खास टोपी घालून आले आहेत. यावेळी त्यांनी ही टोपी घालण्यामागचे कारणही सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

काय म्हणाले आमदार अमोल खताळ?

वविधिमंडळाच्या विशेष अधिवेशनासाठी विधिमंडळ परिसरात संगमनेरचे नवनिर्वाचित आमदार अमोल खताळ यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पुढील पाच वर्षांच्या काळात मतदारसंघासाठी काय करणार हे सांगितले. यावेळी त्यांच्या डोक्यावर खास भगवी टोपी असल्याचे पाहायला मिळाले. यावेळी भगवी टोपी घालण्यामागचे कारण विचारल्यावर आमदार खताळ म्हणाले, “ही टोपी घालण्यामागे कोणताही वेगळा हेतू नाही. पण, ज्यावेळी मी विधानसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल करायला निघालो होतो, तेव्हा मतदारसंघातील युवकांनी ही टोपी दिली होती. तेव्हापासून ही टोपी माझ्यासाठी चांगला शकुन ठरत आहे.”

कोण आहेत अमोल खताळ?

अमोल खताळ यांनी त्यांची राजकीय कारकिर्द काँग्रेसमधून सुरू केली. पुढे त्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत अमोल खताळ हे संगमनेर मतदारसंघातून भाजपाच्या तिकिटावर लढण्यास इच्छुक होते. मात्र, महायुतीच्या जागावाटपात ही जागा शिवसेनेला (एकनाथ शिंदे) गेली. त्यानंतर महायुतीच्या नेत्यांनी यावर तोडगा काढत खताळ यांना शिवसेनेकडून (एकनाथ शिंदे) उमेदवारी दिली. यावेळी खताळ यांच्यासमोर आठ वेळचे काँग्रेसचे आमदार बाळासाहेब थोरात यांचे आव्हान होते. सुरुवातील थोरात यांच्या बाजूने एकतर्फी वाटत असलेल्या या निवडणुकीत खताळ यांनी १० हजार ५६० मतांनी विजय मिळवला. खताळ यांच्या या विजयानंतर त्यांची राज्यभरात चर्चा झाली होती.

हे ही वाचा : अजित पवारांची मालमत्ता आयकर विभागाकडून मुक्त; काय आहे नेमकं प्रकरण? पार्थ आणि सुनेत्रा पवार यांनाही दिलासा

आठ निवडणुकीनंतर बाळासाहेब थोरात पराभूत

काँग्रेसचे दिग्गज नेते बाळासाहेब थोरात यांनी यापूर्वी संगमनेर विधासभा मतदारसंघातून तब्बल आठ वेळा विजय मिळवला होता. त्यामुळे मतदारसंघावर त्यांची पकड मजबूत होती. थोरात यांनी १९८५ मध्ये पहिल्यांदा अपक्ष म्हणून विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यानंतर ते काँग्रेसमध्ये सहभागी झाले होते. १९८५ ते २०१९ पर्यंत आठ वेळा विजय मिळवणाऱ्या थोरात यांनी या काळात अनेक महत्त्वाची मंत्रिपदे भूषवली आहेत.