Balasaheb Thorat Loss : विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल २३ नोव्हेंबर रोजी जाहीर झाला. विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळालं तर महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला. ही विधानसभेची निवडणूक महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी अटीतटीची होईल असं अनेकांना वाटलं होतं. पण महायुतीने मोठं घवघवीत यश मिळवलं तर महाविकास आघाडीतील अनेक दिग्गज नेत्यांना पराभवाचा धक्का बसला.

यामध्ये सर्वात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांचा संगमनेर मतदारसंघातून पराभव झाला. त्यांच्या विरोधात निवडणूक लढलेले अमोल खताळ हे विजयी झाले आहेत. त्यांनी शिवसेना (शिंदे) पक्षाकडून निवडणूक लढवली होती. अमोल खताळ यांनी तब्बल बाळासाहेब थोरात यांचा पराभव केल्याने ते ‘जायंट किलर’ ठरले आहेत. त्यामुळे त्यांची राज्याच्या राजकारणात मोठी चर्चा सुरु आहे. या पार्श्वभूमीवर अमोल खताळ (Who is Amol Khatal) नेमकं कोण आहेत? याविषयी त्यांची थोडक्यात माहिती जाणून घेऊयात.

devendra fadnavis ajit pawar eknath shinde (3)
Devendra Fadnavis Video: गृहखातं पुन्हा तुमच्याकडेच येणार का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, “अरे बाबा…”
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Ravindra Waikar And Amol Kirtikar
Ravindra Waikar : रवींद्र वायकरांची खासदारकी जाणार की राहणार? मुंबई उच्च न्यायालयाने राखून ठेवला निर्णय
rahul gandhi rajnath singh
Rahul Gandhi: काँग्रेसचं अनोखं आंदोलन, संरक्षण मंत्र्यांसह सत्ताधारी खासदारांना दिलं गुलाबाचं फूल आणि राष्ट्रध्वज!
Nana Patole
Nana Patole : “उत्तमराव जानकरांसह आम्ही खूप लोक राजीनामा द्यायला तयार, पण…”; नाना पटोलेंचं मारकडवाडीत मोठं विधान
Sudhir Mungantiwar On Karnataka
Sudhir Mungantiwar : “कर्नाटक सरकारला याचा हिशेब द्यावा लागेल”; सुधीर मुनगंटीवार यांचा इशारा, कारण काय?
Uday Samant On Jayant Patil
Uday Samant : “जयंत पाटील महायुतीत येणार असतील तर…”, शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
Amol Mitkari On Maharashtra Cabinet Expansion
Amol Mitkari : मंत्रिमंडळाचा विस्तार कधी? गृहमंत्रिपद कोणाकडे जाणार? अजित पवार गटाच्या नेत्याचं मोठं भाष्य

हेही वाचा : Video: लाभार्थीकरण, धर्माची फोडणी आणि चमचमीत यश; गिरीश कुबेर यांनी सांगितली महायुतीच्या विजयाची ‘रेसिपी’!

कोण आहेत अमोल खताळ?

शिवसेना (शिंदे) पक्षाकडून अमोल खताळ यांनी संगमनेर मतदारसंघातून निवडणूक लढवली. खरं तर विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर अमोल खताळ यांनी भारतीय जनता पक्षातून शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. त्यानंतर त्यांना शिवसेनेचं तिकीट मिळालं. भाजपा नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे निकटवर्तीय म्हणून अमोल खताळ यांना ओळखलं जातं. अमोल खताळ यांची मोठी राजकीय पार्श्वभूमी नाही. मात्र, तरीही त्यांनी तब्बल आठ वेळा आमदारकीची निवडणूक जिंकलेल्या बाळासाहेब थोरातांचा पराभव केल्यामुळे ते राज्याच्या राजकारणात चर्चेत आले आहेत.

अमोल खताळ यांची राजकीय सुरुवात ही संगमनेर तालुका स्थरावर काँग्रेसचे पदाधिकारी म्हणून झाली होती. मात्र, पुढे त्यांनी बाळासाहेब थोरातांच्या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त करत राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वात काम सुरु केलं. पुढे अमोल खताळ यांनी संगमनेर तालुक्यात मोठा जनसंपर्क तयार केला. यातच २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत महायुतीत संगमनेर विधानसभा मतदारसंघ शिवसेना शिंदे गटाकडे गेला. त्यामुळे अमोल खताळ यांनी शिवसेनेत प्रवेश करत विधानसभा निवडणूक लढवली आणि दिग्गज नेते बाळासाहेब थोरात यांचा दारूण पराभव केला.

दरम्यान, विधानसभेच्या निकालात अमोल खताळ यांनी पोस्टल मतदानाची फेरी सोडता मतदानाच्या प्रत्येक फेरीत घेतलेली आघाडी शेवटपर्यंत कायम ठेवली. २१ पैकी एकाही फेरीत थोरातांना आघाडी घेता आली नाही. खताळ यांना एक लाख १२ हजार ३८६, तर थोरात यांना एक लाख एक हजार ८२६ मते मिळाली. त्यामुळे जायंट किलर ठरलेले खताळ १० हजार ५६० मतांनी विजयी झाले.

Story img Loader