अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंडखोरी केल्यानंतर आता पक्षात दोन गट पडले आहेत. दोन्ही गटांमधील वरिष्ठ नेते त्यांच्याबरोबर असणाऱ्या आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांना वेगवेगळ्या जबाबदाऱ्या आणि पदं सुपूर्द करत आहेत. दरम्यान, शरद पवार यांच्या गटाने खासदार अमोल कोल्हे यांना मोठी जबाबदारी दिली आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी (११ जुलै) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रचारप्रमुखपदी खासदार अमोल कोल्हे यांची नियुक्ती केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने याविषयीची माहिती सोशल मीडियाद्वारे दिली आहे. पक्षाने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून केलेल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या मान्यतेने आगामी निवडणुकांसाठी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रचार प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते अमोल कोल्हे यांना नियुक्तीचे पत्र सुपूर्द करण्यात आले. यावेळी पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि महाराष्ट्र प्रभारी खासदार सुप्रिया सुळे, कोषाध्यक्ष माजी आमदार हेमंत टकले उपस्थित होते.

Uddhav Thackeray on PM Narendra Modi
“आधी मणिपूर ‘सेफ’ करा आणि मग…”; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं मोदी सरकारवर टीकास्र!
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Liquor and fish stocks seized in Bhayander news
मतदारांना आमिषे दाखविण्यास सुरवात; भाईंदरमध्ये मद्य आणि मासळाची साठा जप्त
Nishigandha Wad
हिंदी मालिकेच्या सेटवर निशिगंधा वाड यांचा अपघात; तातडीने रुग्णालयात केलं दाखल
sharad pawar rain speech
Sharad Pawar: “मी बोलायला लागलो की पाऊस येतो आणि निकाल…”, शरद पवारांचं सूचक विधान; पावसातल्या ‘त्या’ सभेची पुन्हा चर्चा!
sana malik
Sana Malik : “नवाब मलिक तुरुंगात असताना पक्षातील लोकांनी…”, सना मलिक यांचा गंभीर आरोप!
judiciary curb politics Courts Marathi speaking Chief Justice
मनमानी राजकारणावर न्यायव्यवस्था अंकुश ठेवू शकेल?

पक्षाने मोठी जबाबदारी दिल्यानंतर खासदार अमोल कोल्हे यांनी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे आभार मानले आहेत. कोल्हे यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये म्हटलंय की, आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रचारप्रमुखपदी माझी नियुक्ती करण्यात आली. माझ्यावर हा विश्वास दाखवत ही जबाबदारी दिल्याबद्दल शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे मी आभार मानतो! तुम्ही सर्वांनी दाखवलेला हा विश्वास मी नक्कीच सार्थ ठरवेन!

अजित पवारांना इशारा

गेल्या काही दिवसांपासून अमोल कोल्हे सातत्याने जाहीर भाषणांमधून, समाजमाध्यमांवरील त्यांच्या पोस्टमधून महाराष्ट्रातील राजकीय घटनांबद्दल आक्रमक भाष्य करत आहेत. नुकतीच जिममध्ये वजन उचलतानाची ध्वनिचित्रफीत त्यांनी समाजमाध्यमांवर शेअर केली आहे. त्या खाली ‘इथे आल्यावर दोन गोष्टी नक्की समजतात… १. जे काही उचलायचं (वजन असो की जबाबदारी)’ ते ‘स्वत:च्या’ ताकदीवर, मोठ्या पदावर बसलेल्या तीर्थरुपांच्या नव्हे’ अशा शब्दांत अमोल कोल्हे यांनी अजित पवारांना टोला लगावला आहे. तसे ‘जे आणि जेवढं ‘पेलवल’ तेवढच उचलावं…’ असे सांगत बोलण्याविषयी भान ठेवण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे.