महाराष्ट्रात सध्या ‘शिवपुत्र संभाजी’ या महानाट्याची खूप चर्चा आहे. अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यात प्रमुख भूमिकेत आहेत. या महानाट्याचे प्रयोग राजयभर सुरू आहेत. आता या महानाट्याचा साताऱ्यात प्रयोग होणार आहे. याआधी अभिनेते आणि खासदार आमोल कोल्हे यांनी एक पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी महानाट्यासह राजकीय प्रश्नांना देखील उत्तरं दिली. यावेळी अमोल कोल्हे यांना प्रश्न विचारण्यात आला की, अलिकडेच लोकसभेत तुम्ही केलेल्या एका भाषणाचं थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वांसमोर कौतुक केलं. तुम्हाला आता भारतीय जनता पार्टीकडून काही ऑफर आहे का? हा प्रश्न ऐकल्यावर अमोल कोल्हे आधी हसले आणि यावर स्पष्टपणे उत्तरही दिलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अमोल कोल्हे पत्रकारांना महणाले की, “तुम्ही एखादी चांगली बातमी केली आणि दुसऱ्या वर्तमानपत्राच्या संपादकांनी तुमचं कौतुक केलं तर तुम्ही तिकडे जाणार आहात का असं मी तुम्हाला विचारलं तर चालेल का? मुळात असं असतं का?” त्यावर समोरून प्रश्न आला, “पंतप्रधान मोदींनीच तुमचं कौतुक केलंय ही ऑफर नाही का?” त्यावर अमोल कोल्हे म्हणाले, “पंतप्रधानांनी असं लोकसभेत कौतुक केलं ही अभिमानाचीच गोष्ट आहे. परंतु ही काही ऑफर नाही, कोण म्हणतंय ही ऑफर आहे? मुळात ऑफर तर यायला पाहिजे.”

हे ही वाचा >> Breaking: जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात; खासगी बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू

“सध्या ऑफर एकच”

अमोल कोल्हे म्हणाले, सध्या ऑफर एकच आहे, शिवपुत्र संभाजी हे नाटक पाहायला या, ते जास्त महत्त्वाचं आहे. राजकारण, राजकीय पदं या गोष्टी केवळ पाच वर्षांसाठी असतात. परंतु शिवपुत्र संभाजी या महानाट्याद्वारे लोकांच्या, लहान मुलांच्या काळजावर जे कोरलं जाणार आहे ते जास्त शास्वत आहे.

अभिनेते अमोल कोल्हे सध्या शिवपुत्र संभाजी या महानाट्याचे राज्यभर प्रयोग करत आहेत. या नाटाकासाठी ते मोठी मेहनत घेत आहे. या नाटकाचे अनेक व्हिडीओ, अमोल कोल्हे या नाटकासाठी घेत असेलेले कष्ट दाखवणारे व्हिडीओ सोशल मीडियावर दिसत आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amol kolhe denies offer from bjp says narendra modi only praised asc
Show comments