मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिंदे गटाचा पहिलाच दसरा मेळावा मुंबईतील बिकेसी मैदानात पार पडला. या मेळाव्यासाठी शिंदे गटाकडून जोरदार तयारी करण्यात आली होती. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे कुटुंबाला लक्ष्य केलं. दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या भाषणावेळी शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर यांना डुलकी लागल्याचा दावा करत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी आणि शिवेसना नेत्या किशोरी पेडणेकर यांनी दीपक केसरकरांना खोचक टोला लगावला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा – “मोदी-शाहांनी लिहिलेलं भाषण मुख्यमंत्र्यांनी…” नाना पटोलेंचा एकनाथ शिंदेंना खोचक टोला!

अमोल मिटकरींचा केसरकरांना टोला

दीपक केसरकर यांना भरसभेत डुलकी लागल्याचे म्हणत अमोल मिटकरी यांनी केसरकरांना खोचक टोला लगावला. “केसरकर यांना एकनाथ शिंदे यांच्या भाषणावेळी डुलकी लागली नव्हती, तर ते हिंदुत्वाची काळजी करत आत्मचिंतन करत होते, म्हणजे समाधी लागली होती”, असे ट्वीट अमोल मिटकरी यांनी केले.

हेही वाचा – आनंद दिघेंच्या संपत्तीवरून मुख्यमंत्री शिंदेंचे उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप, मनसेकडून पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

किशोरी पेडणेकरांचीही टीका

दरम्यान, शिवेसना नेत्या किशोरी पेडणेकर यांनीही दीपक केसकर यांच्या डुलकीवरून शिंदे गटाला लक्ष केले. “कालच्या मेळाव्यासाठी शिंदे गटातील आमदारांनी अपार मेहनत घेतली होती, त्यामुळे केसरकरांना व्यासपिठावरच झोप लागली होती”, अशी टीका त्यांनी केली.