Amol Mitkari Slams Gulabrao Patil Statement over Ajit Pawar : राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आठ दिवस झाले तरी अद्याप महायुतीने सत्तास्थापनेचा दावा केलेला नाही. २८८ पैकी तब्बल २३५ जागा जिंकून महायुतीने न भूतो न भविष्यति अशा प्रकारची कामगिरी केली आहे. मात्र, महायुतीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा काही ठरलेला नाही. त्यामुळे महायुतीवर विरोधक टीका करू लागले आहेत. अशातच महायुतीचे नेते देखील एकमेकांवर टीका करताना दिसत आहेत. “महायुतीत अजित पवार आमच्या मध्ये (भाजपा व एकनाथ शिंदेंची शिवसेना) नसते तर आमच्या ९० ते १०० जागा निवडून आल्या असत्या”, असा दावा शिवसेनेचे (शिंदे) नेते तथा माजी पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलं आहे. त्यावर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीने (अजित पवार) जशास तसं उत्तर दिलं आहे. या पक्षाचे प्रवक्ते व विधान परिषद सदस्य अमोल मिटकरी म्हणाले, “अजित पवार नसते तर शिंदे गटाच्या ९० ते १०० जागा आल्या असत्या हा गुलाबराव पाटलांचा गोड गैरसमज आहे. त्यांनी महायुतीत मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करू नये”.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा