Amol Mitkari on Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapsed : सिंधुदुर्ग येथील मालवणच्या राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा सोमवारी (२६ ऑगस्ट) कोसळला. आठ महिन्यांपूर्वी या पुतळ्याचं लोकार्पण करण्यात आलं होतं. या घटनेवरुन विरोधक राज्य सरकारवर टीका करत आहेत. दरम्यान, याबाबत सत्ताधारी पक्षातील एका आमदारानेही संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजित पवार गटातील आमदार अमोल मिटकरी यांनी या पुतळ्याचा शिल्पकार जयदीप आपटे याच्यावर संताप व्यक्त केला आहे. मिटकरी म्हणाले, “आपटे नावाच्या एका नवशिक्या शिल्पकाराने छत्रपती शिवाजी महाराजांचं शिल्प तयार केलं होतं. त्याने तयार केलेला पुतळा राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आला. या पुतळ्यावर, छत्रपती शिवाजी महाराजांच्या डाव्या डोळ्याच्या भुवईजवळ एक खोच दाखवण्यात आली आहे. या संदर्भात त्याने सनातन प्रभातला दिलेल्या मुलाखतीमध्ये दिलेल्या उत्तरावरून यात त्याचा काही छुपा अजेंडा होता का असा प्रश्न पडला आहे”.

आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) म्हणाले, “आपटे याने त्याच्या मुलाखतीत म्हटलं होतं की त्याला १६५९ नंतरचे छत्रपती शिवाजी महाराज रेखाटायचे होते. १६५९ मध्ये अफजलखानाबरोबर झालेल्या रणसंग्रामावेळी खानाने छत्रपती शिवाजी महाराजांवर हल्ला केला होता. मात्र, ऐतिहासिक संदर्भ थोडे वेगळे आहेत. जेधे शकावली, कवी परमानंद यांनी लिहिलेलं शिवभारत, तत्कालीन शाहीर अज्ञानदास यांनी लिहिलेले पोवाडे, तसेच इतिहासाची इतर साधने सांगतात की महाराज अफजलखानाशी दोन हात करण्यासाठी गेले तेव्हा खानाचा वकील कृष्णाजी भास्कर कुलकर्णी याने शिवाजी महाराजांवर दांडपट्ट्याने वार केला होता. त्यामध्ये महाराजांना छोटी इजा झाली होती. याबाबतचा उल्लेख अनेक ठिकाणी आढळतो. मात्र अशा प्रकारचा पुतळा बनवून आपटे याला काय सांगायचं होतं? हे लोक छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची किती प्रतारणा करणार आहेत? यांची मळमळ अजून का गेली नाही?”

When Devendra Fadnavis becomes Chief Minister conspiracy is hatched to create communal tension says Amar Sable
“देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतात तेव्हा जातीय तणाव निर्माण करण्याचं षड्यंत्र…”- अमर साबळे
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Sadabhau Khot
“राहुल गांधींचं एकच स्वप्न, मेरी शादी कब होगी?” मारकडवाडीतून सदाभाऊ खोतांचा चिमटा; ‘खळं लुटणारा’ म्हणत पवारांवर टीका
Sudhir Mungantiwar On Karnataka
Sudhir Mungantiwar : “कर्नाटक सरकारला याचा हिशेब द्यावा लागेल”; सुधीर मुनगंटीवार यांचा इशारा, कारण काय?
Shivsena UBT News
Shiv Sena UBT : “ठाकरेंच्या शिवसेनेला नाकारण्याचा जनतेचा निर्णय किती योग्य, हेच पुन्हा अधोरेखित होतंय”, भाजपा नेत्याची आगपाखड
What Devendra Fadnavis Said About Rahul Narwekar ?
Devendra Fadnavis : “राहुल नार्वेकर पुन्हा येईन म्हणाले नव्हते तरीही पुन्हा आले..”, देवेंद्र फडणवीस यांचं खुमासदार भाषण
in pune Karvenagar area drunk gang attacked youth due petty dispute
कर्वेनगरमध्ये मद्यपींकडून तरुणावर हल्ला, तिघांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गु्न्हा
Iltija Mufti news
Iltija Mufti : “हिंदुत्व हा एक आजार, कारण..”; रतलामचा व्हिडीओ पोस्ट करत इल्तिजा मुफ्ती यांचं वादग्रस्त वक्तव्य
Amol Mitkari
अमोल मिटकरी यांची एक्सवरील पोस्ट (PC : Amol Mitkari/X)

हे ही वाचा >> Sangeeta Thombre : भाजपा नेत्या संगीता ठोंबरेंच्या कारवर दगडफेक, चालकासह माजी आमदार जखमी; उपचारासाठी रुग्णालयात दाखल

देवेंद्र फडणवीसांकडे केली कारवाईची मागणी

मिटकरी (Amol Mitkari) म्हणाले, “राजकोट किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा देशातला असा एकमेव पुतळा होता ज्यामध्ये अशी खून दाखवण्यात आली आहे. कोट्यवधी रुपयांचं कंत्राट घेतलं, त्या माध्यमातून छुपा अजेंडा चालवण्याचं पाप आपटे याने केलं आहे. माझी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे की त्यांनी आपटेवर कारवाई करावी. मिसरूड न फुटलेल्या, अनुभव नसलेल्या अक्कलशून्य माणसावर म्हणजेच जयदीप आपटे याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्याला जेलबंद करावं”.

Story img Loader