Amol Mitkari on Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapsed : सिंधुदुर्ग येथील मालवणच्या राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा सोमवारी (२६ ऑगस्ट) कोसळला. आठ महिन्यांपूर्वी या पुतळ्याचं लोकार्पण करण्यात आलं होतं. या घटनेवरुन विरोधक राज्य सरकारवर टीका करत आहेत. दरम्यान, याबाबत सत्ताधारी पक्षातील एका आमदारानेही संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजित पवार गटातील आमदार अमोल मिटकरी यांनी या पुतळ्याचा शिल्पकार जयदीप आपटे याच्यावर संताप व्यक्त केला आहे. मिटकरी म्हणाले, “आपटे नावाच्या एका नवशिक्या शिल्पकाराने छत्रपती शिवाजी महाराजांचं शिल्प तयार केलं होतं. त्याने तयार केलेला पुतळा राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आला. या पुतळ्यावर, छत्रपती शिवाजी महाराजांच्या डाव्या डोळ्याच्या भुवईजवळ एक खोच दाखवण्यात आली आहे. या संदर्भात त्याने सनातन प्रभातला दिलेल्या मुलाखतीमध्ये दिलेल्या उत्तरावरून यात त्याचा काही छुपा अजेंडा होता का असा प्रश्न पडला आहे”.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा