अजित पवारांसह काही आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये दोन गट पडले आहेत. दोन्ही गटांकडून आज (बुधवार, ५ जुलै) मुंबईत मेळाव्यांचं आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्यांद्वारे दोन्ही गटांनी शक्तीप्रदर्शन केलं. तसेच यावेळी दोन्ही गटातील नेत्यांनी एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडल्या. दरम्यान, अजित पवारांच्या बंडखोरीला तीन दिवस उलटले तरी त्यांच्याबरोबर नेमके किती आमदार आहेत हे कोणीही स्पष्ट केलं नव्हतं. अजित पवार गटाकडून याबद्दल वेगवेगळे दावे केले जात होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी सकाळी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं की, अजित पवारांबरोबर ९० टक्क्यांहून अधिक आमदार आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले होते की, शपथ घेणारे केवळ नऊ आमदार अजित पवारांबरोबर आहेत. बाकीचे सर्व आमदार शरद पवारांबरोबर आहेत. तर अजित पवारांच्या गटातील अनेक नेते म्हणत होते की, सरकार आधीपासूनच बहुमतातलं आहे. त्यामुळे आम्हाला बहुमत सिद्ध करावं लागणार नाही. म्हणूनच आमदारांच्या संख्येबद्दल प्रश्न विचारण्याला काहीच अर्थ नाही. तर अजित पवार म्हणाले आमदारांचा आकडा सांगायला तो काही मटक्याचा आकडा नाही.

Sharad Pawar on age
Sharad Pawar : “मी काय म्हातारा झालोय का? इथं एक म्हातारं…”, शरद पवारांचा मिश्किल सवाल; म्हणाले, “या लोकांच्या हाती…”
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
Ajit Pawar on Yogi Adityanath
योगी आदित्यनाथांमुळे अजित पवारांची गोची; मोदी-शाहांची एकही सभा नाही; अस्तित्वाची लढाई राष्ट्रवादी कशी लढणार?
Narendra modi Rahul Gandhi Bal Thackeray
Narendra Modi : नरेंद्र मोदींचं मविआ नेत्यांना आव्हान; बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख करत म्हणाले, “राहुल गांधींकडून…”
saif ali khan threat inter religion marriage
आंतरधर्मीय विवाहामुळे सैफ अली खानला मिळाल्या होत्या धमक्या; स्वतः खुलासा करत म्हणालेला, “आमच्या घराजवळ…”
Sanjay singh
Sanjay Singh: आपचे राष्ट्रीय प्रवक्ते संजय सिंह म्हणतात, “हम ना बटेंगे ना कटेंगे; हम भाजप को लपेटेंगे”
Lakhat Ek Aamcha Dada
चांगले वागण्याचे नाटक करून डॅडींचा सूर्याला फसविण्याचा प्लॅन; प्रोमो पाहताच नेटकरी म्हणाले, “तुमचं पोरगं आणि तुम्ही…”
sanjay raut on dhananjay mahadik ladki bahin statement
“…म्हणून महिलांना धमक्या दिल्या जात आहेत”; धनंजय महाडिकांच्या ‘त्या’ विधानावरून संजय राऊतांचा हल्लाबोल!

दरम्यान, आता अजित पवारांबरोबर नेमके किती आमदार आहेत याची माहिती अजित पवार गटाचे प्रवक्ते आणि विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी जाहीर केली आहे. अजित पवारांनी काही वेळापूर्वी त्यांच्या गटातील आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर आमदार मिटकरी यांनी टीव्ही ९ मराठीशी बातचित करताना त्यांच्या गटात असलेल्या एकूण आमदारांची संख्या सांगितली.

हे ही वाचा >> “शरद पवारांच्या परस्पर काहीजण…”, अजित पवार गटाचा जितेंद्र आव्हाडांवर हल्लाबोल

आमदार अमोल मिटकरी म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसची पुढची रणनीति काय असेल यावर आजच्या बैठकीत चर्चा झाली. सर्व आमदारांच्या मतदारसंघांमध्ये काय समस्या आहेत, त्या अजित पवार यांनी जाणून घेतल्या. त्यावर छगन भुजबळ आणि अजित पवार यांनी मार्गदर्शन केलं. जनतेची कामं पुढे नेऊयात असं आजच्या बैठकीत ठरलं आहे. आजच्या बैठकीला विधानसभेचे एकूण ३४ आमदार उपस्थित होते. तसेच विधान परिषदेचे एकूण ५ आमदार उपस्थित होते. असे दोन्ही मिळून एकूण ३९ आमदार आमच्याबरोबर आहेत. आणखी तीन ते चार आमदारांनी (शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील) आमच्याशी संपर्क साधला आहे