उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार तसेच शरद पवार गटातील खासदार अमोल कोल्हे यांच्यात सध्या शाब्दिक युद्ध चालू आहे. “शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी आमच्याकडे पर्यायी उमेदवार असून पुढच्या निवडणुकीत आमचा उमेदवार आम्ही निवडून आणू,” असं वक्तव्य करत अजित पवार यांनी अमोल कोल्हे यांना आव्हान दिलं आहे. अजित पवारांचं आव्हान स्वीकारत अमोल कोल्हे म्हणाले, “१०० टक्के मी निवडणूक लढवणार. शरद पवार घेतील तो निर्णय मला मान्य असेल.” तसेच अमोल कोल्हे यांनी अजित पवार यांचं आव्हान स्वीकारलं आहे.

अजित पवार विरुद्ध अमोल कोल्हे असा सामना चालू असताना अजित पवार गटाचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी यात उडी घेतली आहे. अमोल मिटकरी यांनी काही वेळापूर्वी अकोला येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, अजित पवारांनीच अमोल कोल्हे यांना लोकसभेचं तिकीट दिलं होतं. त्यांना पूर्ण पाठबळ देऊन निवडून आणलं. त्यामुळे आतादेखील अजित पवार ज्याला उमेदवारी देतील तोच उमेदवार शिरूरची लोकसभा निवडणूक जिंकणार. अजित पवार यांनी आव्हान दिलं आहे म्हटल्यावर ते आमचा उमेदवार निवडून आणणारच. याआधी त्यांनी विजय शिवतारेंना पराभूत करण्याचं आव्हान दिलं होतं. त्यांनी ते करून दाखवलं. त्यानंतर अजित पवार म्हणाले, मी अमोल मिटकरीला आमदार करेन, त्यांनी मला आमदार केलं. अजित पवार शब्दाचे पक्के आहेत. त्यामुळे भविष्यात शिरुरचा गड अजित पवारांकडेच असेल.

Liquor and fish stocks seized in Bhayander news
मतदारांना आमिषे दाखविण्यास सुरवात; भाईंदरमध्ये मद्य आणि मासळाची साठा जप्त
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
sharad pawar rain speech
Sharad Pawar: “मी बोलायला लागलो की पाऊस येतो आणि निकाल…”, शरद पवारांचं सूचक विधान; पावसातल्या ‘त्या’ सभेची पुन्हा चर्चा!
ajit pawar baramati assembly election
Ajit Pawar: “मी पेताड, गंजेडी असतो तर ठीक आहे, पण…”, अजित पवारांनी प्रतिभाताई पवारांचा भाषणात केला उल्लेख; म्हणाले…
sana malik
Sana Malik : “नवाब मलिक तुरुंगात असताना पक्षातील लोकांनी…”, सना मलिक यांचा गंभीर आरोप!
ravi rana replied to ajit pawar
“…तेव्हा ‘विनाशकाले विपरीत बुद्धी’ आठवली नाही का? आता परिणाम भोगा”; रवी राणांचं अजित पवारांना प्रत्युत्तर!
What Sanjay Raut Said?
Sanjay Raut : “काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं बाळासाहेबांवर अधिक प्रेम आणि..”, संजय राऊत काय म्हणाले?
Ajit Pawar on Amit Shah
‘देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री?’, अमित शाहांच्या त्या विधानावर अजित पवारांचं मोठं विधान; म्हणाले, “निवडणूक झाल्यावर…”

दरम्यान, अमोल कोल्हे यांनी अजित पवार यांचं आव्हान स्वीकारलं आहे. यावर अमोल मिटकरी म्हणाले, कुस्तीच्या फडात उतरल्यावर आव्हान स्वीकारलंच पाहिजे. शेवटी विजय हा तगड्या पैलवानाचा होतो. अजित पवार आणि अमोल कोल्हे यांची तुलना होऊ शकत नाही. अजित पवार मोठे नेते आहेत आणि अमोल कोल्हे सामान्य कार्यकर्ते आहेत.

हे ही वाचा >> “अजित पवार चार महिन्यांत तुरुंगात जाणार”, शालिनीताई पाटलांचा दावा, एकनाथ शिंदेंबाबतही केलं मोठं वक्तव्य

दरम्यान, अमोल कोल्हे अजित पवार गटात जाणार का? यावरही अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिली. मुंबई तकला दिलेल्या मुलाखतीत मिटकरी म्हणाले, अजित पवारांच्या पाठिंब्यामुळेच अमोल कोल्हे लोकसभा निवडणुकीत जिंकले होते. भाजपाबरोबर जाण्यासाठी पक्षातील पदाधिकारी-आमदार खासदारांनी अजित पवार यांना शपथपत्रं दिली होती. अमोल कोल्हे यांचंही शपथपत्र अजित पवार यांच्याकडे आहे. मी स्वतः ते शपथपत्र वाचलं आहे. मी पक्षाचा प्रतोद असल्यामुळे सर्व शपथपत्रं पाहिली आहेत.