अभिनेत्री उर्फी जावेदच्या कपड्यांवरून चित्रा वाघ चांगल्याच आक्रमक झाल्या होत्या. फॅशनच्या नावाखाली राज्यात नंटगटपणा चालू देणार नाही, असा इशारा चित्रा वाघ यांनी उर्फी जावेदला दिला होता. अशातच चित्रा वाघ यांनी चंद्रकांत पाटील यांची तुलना महात्मा फुले यांच्याशी केल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. ‘घराघरात सावित्री झाल्या आहेत. आम्हाला आता चंद्रकांत पाटील यांच्यासारख्या जोतिबांचा शोध आहे,’ असं एका कार्यक्रमात बोलताना चित्र वाघ यांनी म्हटलं. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी चित्रा वाघ यांच्यावर टीका केली आहे.
नेमकं काय म्हणाल्या चित्रा वाघ?
पुण्यात भाजपातर्फे मकसंक्रांतीनिमित्त ‘सन्मान स्त्री शक्तीचा’ या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमाला मंत्री चंद्रकांत पाटील, चित्रा वाघ यांच्यासह भाजपाच्या महिला पदाधिकारी उपस्थित होत्या. तेव्हा बोलताना चित्रा वाघ म्हणाल्या की, “पुणे हे स्त्री शक्तीचं केंद्र आहे. पुण्यातूनच सर्व स्त्री शक्तीच्या चळवळींची सुरुवात झाली. आम्हाला सावित्री घरोघरी दिसत आहेत. पण, चंद्रकांत पाटील आणि हेमंत रासने यांच्यासारख्या ज्योतिबांचा शोध सुरु आहे. असेच जोतिबा समाजात जास्तीत जास्त निर्माण होवोत, अशा शुभेच्छा देते,” असं चित्रा वाघ यांनी सांगितलं.
हेही वाचा : ‘नितीन गडकरींमध्ये पंतप्रधानपदाच्या खुर्चीला न्याय देण्याची शक्ती,’ शिंदे गटातील नेत्याचे विधान
चित्रा वाघ यांच्या वक्तव्यानंतर अमोल मिटकरी यांनी ट्विट करत हल्लाबोल केला आहे. अमोल मिटकरी यांनी म्हटलं की, “पुण्यात बोलताना चित्रा वाघ यांचं अजब विधान केलं. वाघ यांच्याकडून चंद्रकांत पाटील यांची तुला थेट महात्मा जोतिबा फुलेंशी केली आहे. ‘तुम्हाला सावित्रीबाई घरोघरी दिसायला लागल्या आहेत. चंद्रकांत पाटील यांच्यासारख्या जोतिबांचा शोध जारी आहे,’ हेच विधान इतर पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी केलं असतं तर?”, असा खोचक सवाल अमोल मिटकरींनी चित्रा वाघ यांना विचारला आहे.
हेही वाचा : “हिंदू समाजाचे मोर्चे म्हणजे स्वत:च्या नामर्दानगीवर…”, शिवसेनेचा भाजपावर हल्लाबोल
हेही वाचा : चित्रा वाघ यांनी केली चंद्रकांत पाटलांची महात्मा फुलेंशी तुलना, भाषणात म्हणाल्या; “जोतिबांचा शोध…”
“ती महिला आता पूर्ण कपड्यांमध्ये…”
दरम्यान, या कार्यक्रमात चित्रा वाघ यांनी उर्फी जावेदच्या कपड्यांवरही भाष्य केलं. “माझा विरोध कोणत्याही महिलेला किंवा तिच्या धर्माला नाही. माझा विरोधात हा विकृतीला होता. पण, आता कौतुक केलं पाहिजे, कारण ती महिला आता पूर्ण कपड्यांमध्ये दिसत आहे. कोणत सुधारत असेल तर त्यांचं कौतुक केलं पाहिजे. तिने काही ठरवलं असेल. कारण ती आता चांगल्या कपड्यांमध्ये दिसत आहे,” असं चित्रा वाघ म्हणाल्या.