अकोल्यातील पाणीपुरवठा योजनेवरील स्थगिती उठवण्याच्या मागणीसाठी बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांनी अकोला ते नागपूर अशी ‘जलसंघर्ष’ यात्रा काढली होती. ही यात्रा आज नागपूरमध्ये दाखल होणार होती. मात्र, पोलिसांनी त्यांची ‘जलसंघर्ष’ यात्रा मध्येच अडवली. यावेळी आमदार नितीन देशमुख यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. दरम्यान, या प्रकरणावरून महाविकास आघाडीतील नेत्यांकडून शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका करण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनीही यावरून शिंदे-फडणवीस सरकारला लक्ष्य केलं आहे.

हेही वाचा – Video: …अशी झाली अतिक अहमदची हत्या! पुन्हा प्रवेश, पुन्हा कोसळले दोघं; न्यायालयीन आयोगाने उभा केला तोच प्रसंग

Image of Manmohan Singh's sister
Manmohan Singh Death : मनमोहन सिंग यांच्या बहिणीची व्यथा, आजारपणामुळे घेता येणार नाही भावाच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
vishal gawali who assaulted girl in Chakki Naka area of ​​Kalyan handed over to Kolsewadi police
कल्याणमधील बालिकेचा मारेकरी विशाल गवळी डोंबिवलीतील पोलीस कोठडीत
anupam kher pays tribute to dr manmohan singh
Video : “डॉ. मनमोहन सिंग यांच्या व्यक्तिरेखेला…”; अनुपम खेर यांनी व्हिडीओ शेअर करत माजी पंतप्रधानांना वाहिली श्रद्धांजली, म्हणाले…
Kapil Sharma wanted to beat KRK honey singh
“कपिल शर्मा अभिनेत्याला मारायला गेलेला, त्याच्या दुबईतील घरात काच फोडली, हनी सिंगने त्याचे केस ओढले”
Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
Navri Mile Hitlarla
यश-रेवतीच्या नात्यामुळे सासू-सून पुन्हा समोरासमोर येणार; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत पुढे काय घडणार?
kalyan municipalitys Rukminibai Hospital show that three people were bitten by stray dog
कल्याणमधील भटक्या श्वानाचे तीन जणांना चावे, भटक्या श्वानांच्या उपद्रवाने नागरिक, शाळकरी विद्यार्थी त्रस्त

काय म्हणाले अमोल मिटकरी?

जेव्हापासून शिंदे-फडणवीस सरकार राज्यात सत्तेत आले, तेव्हापासून लोकशाही संपली आणि सैतानी साम्राज्याचा उदय झाला. यांच जिवंत उदाहरण आज बघायला मिळालं. पिण्याच्या पाण्यासाठी अकोला ते नागपूर पायी संघर्ष यात्रा काढणारे नितीन देशमुख यांच्यावर बेकायदेशीरपणे कारवाई करण्यात आली. त्यांना चुकीच्या पद्धतीने अटक केली गेली. हीच सैतानी साम्राज्याची सुरुवात आहे. पण शिंदे-फडणवीस सरकारने हे लक्षात ठेवावं की चार दिवस सासूचे आणि चार दिवस सूनेचे असतात. ज्या दिवशी महाविकास आघाडी सत्तेत येईल, तेव्हा हिशोब केला जाईल, अशी टीका अमोल मिटकरी यांनी केली.

हेही वाचा – जपान दौरा अर्धवट का सोडला? महाराष्ट्रातील सत्तांतराच्या चर्चेवर विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांचं सूचक विधान, म्हणाले…

संजय राऊतांचंही शिंदे सरकारवर टीकास्र

दरम्यान, याच मुद्द्यावून आज सकाळी संजय राऊत यांनीही शिंदे सरकावर टीकास्र सोडलं होते. नितीन देशमुख पाण्यासाठी संघर्ष यात्रा काढत होते. त्याचा सरकारला त्रास व्हायचं कारण काय? बाळापूर भागातील तीन महिन्याचं बाळही खारयुक्त पाणी पिते. या पाण्यामुळे लोकांचं जीवन संकाटत आहे. त्यासाठी उद्धव ठाकरे यांनी पाण्याची योजना मंजूर केली होती. मात्र फडणवीसांनी त्या योजनेवर स्थगिती आणली. नितीन देशमुख हेच खारयुक्त पाणी फडणवीसांना दाखवण्यासाठी नागरपूरला जात होते होते, पण सरकारने त्यांना अडवलं. राज्यात नेमकं चाललंय काय? हे सरकार मोगलाई परत आणताय का? असे ते म्हणाले होते.

Story img Loader