Amol Mitkari criticizes Kirit Somaiya : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा आमदार हसन मुश्रीफ यांचे कागल येथील निवासस्थान तसेच पुण्यातील मालमत्तांवर बुधवारी (११ जानेवारी) सक्तवसुली संचालनालयाने छापेमारी केली. या छापेमारीदरम्यान ईडीच्या अधिकाऱ्यांनी मुश्रीफ यांच्या कुटुंबीयांचीही चौकशी केली. ही छापेमारी तब्बल १२ तास चालली. भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपानंतरच ही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, मुश्रीफ यांच्यावर करण्यात आलेल्या या कारवाईवर राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. किरीट सोमय्या यांची तोतरी जबान आहे. त्यांची जीभ भाजपाविरोधात बोलण्यासाठी फडफड करत नाही. राज्यातील ईडीचे हे सरकार लवकरात लवकर जावे आणि बळीचे राज्य यावे, असे अमोल मिटकरी म्हणाले. ते आज (१२ जानेवारी) बुलढाण्यात ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा