भाजपाचे नेते प्रसाद लाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोकणात झाला, असे विधान केले आहे. लाड यांच्या या विधानानंतर राष्ट्रवादीने आक्रमक पवित्रा धारण केला आहे. राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी तर भाजपाने आता माफी मागून चालणार नाही. त्यांनी आता नाक रगडून प्रायश्चित्त करावे, अशी मागणी केली आहे. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.
हेही वाचा >> शिवाजी महाराजांविषयी बोलताना भाजपाचे प्रसाद लाड यांचे अजब विधान, म्हणाले, “शिवरायांचा जन्म…”
“सकाळ झाली भाजपाचे लोक रोज एक बेताल व्यक्तव्य करत आहेत. अगोदर राज्यपाल यांनी महाराजांविषयी आक्षेपार्ह विधान केले. त्यानंतर सुधांशू त्रिवेदी, मंगलप्रभात लोढा यांनीदेखील वादग्रस्त विधान केले. त्यांनी शिवरायांवर वेगवेगळी वक्तव्यं करण्याची मालिकाच सुरु केली आहे. प्रसाद लाड यांनी नवाच जावई शोध लावला आहे. शिवरायांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला. शिवरायांची राजधानी रायगड होती, असे आम्ही वाचत आलो आहोत. मात्र लाड म्हणत आहेत की शिवरायांचा जन्म कोकणात झाला. विशेष म्हणजे ते स्क्रीप्ट वाजून असे सांगत आहेत. म्हणजे उद्या गुजरात महोत्सव घ्यायचा असेल तर गुजरातच्या लोकांना खुश करण्यासाठी ते शिवरायांचा जन्म गुजरातच्या सुरतमध्ये झाला, असे म्हणतील. हे अत्यंत चुकीचे आहे. याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मूक समर्थन कारणीभूत आहे,” अशी टीका अमोल मिटकरी यांनी केली.
हेही वाचा >> गोपीनाथ मुंडेंविषयी सुषमा अंधारेंचे मोठे विधान, नितीन गडकरींचे नाव घेत म्हणाल्या…
“महाराष्ट्रात याचा उद्रेक होत आहे. आज भाजपाचे नेते अतुल सावे यांच्या घरासमोर मराठा क्रांती मोर्चातर्फे राज्यपालांविरोधात आंदोलन केले जात आहे. असाच उद्रेक वाढत गेला तर यांना पळता भुई थोडी होईल. यांनी आता फक्त माफी मगून चालणार नाही. तर नाग रगडून प्रायश्चित्त करावे. अन्यथा महाराष्ट्रातील जनता यांना सोडणार नाही,” अशी मागणी अमोल मिटकरी यांनी केली.