महाराष्ट्र विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अलीकडेच छत्रपती संभाजी महाराजाबाबत केलेल्या विधानामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे. ‘छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक होते, ते धर्मवीर नव्हते,’ अशा आशयाचं विधान अजित पवारांनी केलं. या विधानानंतर भारतीय जनता पार्टी आक्रमक झाली असून त्यांनी विविध ठिकाणी आंदोलन केलं आहे. तसेच अजित पवारांनी आपल्या वक्तव्याबाबत माफी मागावी, अशी मागणीही भाजपाकडून करण्यात आली आहे.

भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे आणि आशिष शेलार यांनीही अजित पवारांवर टीकास्त्र सोडलं. या घटनाक्रमानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी चंद्रशेखर बावनकुळेंना खुलं आव्हान दिलं. छत्रपती संभाजी महाराजांना किती भाषा ज्ञात होत्या, त्या भाषांची नावं सांगावीत, असं खुलं आव्हान मिटकरींनी बावनकुळेंना दिलं. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.

What Gopal Shetty Said?
Gopal Shetty : भाजपात बंडखोरी! गोपाळ शेट्टींकडून अपक्ष अर्ज दाखल, म्हणाले; “बोरीवली काय धर्मशाळा…”
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
Ajit Pawar
Ajit Pawar : “मी बारामतीतून निवडणूक लढणार नव्हतो, पण…”, अजित पवार स्पष्टच बोलले; म्हणाले, “मी नौटंकी…”
Bigg Boss Marathi season 5 winner suraj Chavan speech at Ajit Pawar Baramati Sabha
Video: तोंड लपवत सूरज चव्हाणची अजित पवारांच्या बारामती सभेत एन्ट्री, एका मिनिटांचं केलं भाषण; म्हणाला, “दादांना झापूक झुपूक…”
Marathi actor abhijeet kelkar reaction on trolling about suraj Chavan his post
“मी ब्राम्हण जातीतला असलो तरी…”, सूरज चव्हाणबद्दल केलेल्या पोस्टवरील ट्रोलिंगवर अभिजीत केळकरचं भाष्य, म्हणाला, “मला शिव्या देऊन..
What Supriya Sule Said About Ajit Pawar ?
Supriya Sule : भाऊबीजेला अजित पवारांची वाट बघणार का? सुप्रिया सुळेंचं उत्तर, “प्रेम असतं तेव्हा…”
Lakhan Malik
Lakhan Malik : भाजपाने तिकीट नाकारल्यामुळे आमदार लखन मलिक ढसाढसा रडले; म्हणाले, “इमानदारीने काम केलं, पण…”
anupam kher kirron kher love story
घटस्फोटित अन् एका मुलाची आई असलेल्या किरण यांच्या प्रेमात पडले होते अनुपम खेर, ‘अशी’ झाली होती पहिली भेट

हेही वाचा- “शिंदे गट गँगवॉरमध्ये मारला जाईल”; राऊतांच्या विधानावर संजय गायकवाडांची प्रतिक्रिया, म्हणाले, “आमच्या टोळक्याचं…”

अजित पवारांच्या विधानाचं समर्थन करताना अमोल मिटकरी म्हणाले की, “छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने वसलेल्या संभाजीनगरमध्ये काल जे पी नड्डा आले होते. यावेळी ते चक्क बाळासाहेब ठाकरेंचं नाव विसरले. ते बाळासाहेब ठाकरेंऐवजी बाळासाहेब देवरा म्हणाले. इतकंच नाही तर, त्यांनी ‘छत्रपती की जय’ अशा घोषणा दिल्या. शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचं औदार्यही त्यांनी दाखवलं नाही.”

हेही वाचा- “भगतसिंह कोश्यारी तुमचा जावई…”, राज्यपालांचा एकेरी उल्लेख करत मिटकरींचा भाजपाला खोचक सवाल!

“आज आशिष शेलार आणि चंद्रशेखर बावनकुळे मोठ्या वल्गना करत आहेत. माझं बावनकुळेंना खुलं आव्हान आहे, छत्रपती संभाजी महाराजांना किती भाषा ज्ञात होत्या? आणि त्या भाषांची नावं बावनकुळेंनी सांगावीत… यासाठी माझं त्यांना खुलं आव्हान आहे. तसेच धर्मवीर आणि स्वराज्यरक्षक यातील फरक तुम्ही आम्हाला शिकवू नये,” असा टोलाही मिटकरींनी लगावला. केंद्रात आणि राज्यात तुघलकी सरकार आहे. सत्तेत बसलेले औरंगजेबाचे वारस आहेत. त्यामुळे जनता लवकरच यांचा कडेलोट केल्याशिवाय राहणार नाही, असंही मिटकरी म्हणाले.