Amol Mitkari on Shivsena NCP Clash in Baramati : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विधानसभा मतदारसंघ बारामती येथे घडलेल्या एका घटनेमुळे महायुतीतलं वातावरण तापल्याचं पाहायला मिळत आहे. बारामतीत शिंदे गटाने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला अजित पवार यांनी निमंत्रण देऊनही उपस्थिती दर्शवली नाही म्हणून शिंदे गटाने नाराजी व्यक्त केली होती. मात्र ही नाराजी व्यक्त करताना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या कृतीमुळे अजित पवार गट संतप्त झाला आहे. शिवसेनेच्या शिंदे गटाने गणेशोत्सवानिमित्त बारामती येथील शारदा प्रांगणात एका सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. अजित पवारांना या कार्यक्रमाचं निमंत्रण दिलं होतं. मात्र अजित पवार या कार्यक्रमाला न आल्याने शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेंद्र जेवरे यांनी कार्यक्रमस्थळी लावलेल्या पोस्टर्सवरील अजित पवारांचे फोटो काळ्या कपड्याने झाकले. त्यामुळे शहरात तणाव निर्माण झाला होता.

दरम्यान, यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रवक्ते व विधान परिषद सदस्य अमोल मिटकरी यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. मिटकरी म्हणाले, “प्रत्येक पक्षात असे हौशे, नवशे, गवसे असतात. कोणी काळे झेंडे दाखवून अपमान करतं, तर कोणी पोस्टर काळ्या कपड्याने झाकून विरोध दर्शवतं. मात्र यामुळे त्यांच्याच पक्षांची बदनामी होते. काही दिवसांपूर्वी भाजपाच्या कार्यकर्त्या आशा बुचके यांनी अजित पवारांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले होते. त्यांच्यामुळे भाजपाचीच बदनाम झाली. आता शिंदे गटाच्या बारामती जिल्हाध्यक्षाने अजित पवारांचं पोस्टर काळ्या कपड्याने झाकलं आहे. त्यांच्या या कृतीमुळे शिवसेनेचा शिंदे गट बदनाम झाला आहे. या घटनांमुळे कधी भाजपाची तर कधी शिंदे गटाची बदनामी होते”.

Redevelopment , Developers Committee, Old Thane ,
जुन्या ठाण्यातील पुनर्विकासासाठी विकासकांची समिती
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
uddhav Thackeray Devendra fadnavis
“पुढील मकर संक्रांतीपर्यंत ठाकरे-फडणवीस एकत्र”, आमदार रवी राणांचा दावा
Controversy over MLA Suresh Khades statement about Miraj constituency as mini Pakistan
मिरजेच्या उल्लेखावरून वातावरण तापले
Ajit Pawar dhananjay munde walmik karad
“बळं बळं चौकशी…”, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर अजित पवारांचा संताप; म्हणाले, “या प्रकरणात…”
Who is BJP Chief Minister candidate for Delhi Assembly Elections 2025
केजरीवालांनी जाहीर केला भाजपाचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा; अमित शाह संतापून म्हणाले, “तुम्ही भाजपाचे…”
santosh deshmukh latest news in marathi
‘‘संतोष देशमुखच्या मारेकऱ्यांना फाशी द्या”, वाशीममध्ये सर्वपक्षीय मोर्चात मूक आक्रोश
Vijay Wadettiwar On Thackeray group
Vijay Wadettiwar : “आम्ही उद्धव ठाकरेंना विनंती करू, अन्यथा…”, ठाकरे गटाच्या स्वबळाच्या घोषणेवर विजय वडेट्टीवारांचं मोठं विधान

हे ही वाचा >> “मला न विचारताच घोषणा”, किरीट सोमय्यांनी भाजपाचा आदेश धुडकावला; म्हणाले, “पुन्हा अशी वागणूक…”

…तर आमच्या भावनेचा उद्रेक होऊ शकतो : मिटकरी

अमोल मिटकरी म्हणाले, “महायुतीत तीन पक्षांमध्ये एकवाक्यता असायला हवी. ती असल्याशिवाय विधानसभा निवडणुकीत महायुतीला यश मिळणार नाही. अशा पद्धतीने दररोज जाणीवपूर्वक काहीतरी नवीन गोष्ट करून एखाद्या पक्षाला डिवचण्याचा प्रयत्न होत असेल तर महायुतीच्या समन्वय समितीने यात लक्ष घातलं पाहिजे. या लोकांना त्यांच्या वरिष्ठांनी तंबी दिली पाहिजे. कारण आमच्याही भावनेला काही मर्यादा आहेत. आमच्याही भावनेचा उद्रेक होऊ शकतो आणि तसं झाल्यास मोठा विध्वंस होईल”.

हे ही वाचा >> “आजच्या घटनेमुळे शिंदे गट बदनाम झालाय”, अजित पवार गटाची टीका; महायुतीत वादाची ठिणगी?

“आमच्या मर्यादेचा अंत पाहू नका”; अमोल मिटकरींचा संताप

राष्ट्रवादीचे आमदार म्हणाले, “कोणताही कार्यकर्ता उठतो आणि अशा प्रकारे अजित पवारांच्या पोस्टरवर काळा कपडा टाकून सूर्याला झाकण्याचा प्रयत्न करतो. हे पाहून मला असं वाटतं की हा उन्मत्तपणा आहे. त्यांच्या उन्मत्तपणाला आमच्या कार्यकर्त्यांनी उत्तर दिलं आहे. शिशुपालासारख्या शंभर चुका माफ होतात. शेवटी भगवान श्रीकृष्णानेही संयम सोडला होता. आपण ते महाभरतात वाचलंच आहे. घोडा अन् मैदान दूर नाही, अजून वेळ गेली नाही. त्यांच्या नेत्यांनी त्यांना योग्य समज द्यावी. शेवटी आमच्या संयमालाही काही मर्यादा आहेत, आमच्या मर्यादेचा अंत पाहू नका”.

Story img Loader