Amol Mitkari on Shivsena NCP Clash in Baramati : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विधानसभा मतदारसंघ बारामती येथे घडलेल्या एका घटनेमुळे महायुतीतलं वातावरण तापल्याचं पाहायला मिळत आहे. बारामतीत शिंदे गटाने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला अजित पवार यांनी निमंत्रण देऊनही उपस्थिती दर्शवली नाही म्हणून शिंदे गटाने नाराजी व्यक्त केली होती. मात्र ही नाराजी व्यक्त करताना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या कृतीमुळे अजित पवार गट संतप्त झाला आहे. शिवसेनेच्या शिंदे गटाने गणेशोत्सवानिमित्त बारामती येथील शारदा प्रांगणात एका सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. अजित पवारांना या कार्यक्रमाचं निमंत्रण दिलं होतं. मात्र अजित पवार या कार्यक्रमाला न आल्याने शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेंद्र जेवरे यांनी कार्यक्रमस्थळी लावलेल्या पोस्टर्सवरील अजित पवारांचे फोटो काळ्या कपड्याने झाकले. त्यामुळे शहरात तणाव निर्माण झाला होता.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा