महाराष्ट्र विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अलीकडेच छत्रपती संभाजी महाराजाबाबत केलेल्या विधानामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे. ‘छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक होते, ते धर्मवीर नव्हते,’ अशा आशयाचं विधान अजित पवारांनी केलं. या विधानानंतर भारतीय जनता पार्टी आक्रमक झाली असून त्यांनी विविध ठिकाणी आंदोलन केलं आहे. तसेच अजित पवारांनी आपल्या वक्तव्याबाबत माफी मागावी, अशी मागणीही भाजपाकडून करण्यात आली आहे.

या सर्व घडामोडीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी तुमचा जावई लागतो का? असा खोचक सवाल मिटकरींनी विचारला आहे. तसेच देशात आणि राज्यात दोन्ही ठिकाणी औरंगजेबाचे वारसदार बसले आहेत, अशी टीकाही मिटकरींनी केली. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.

Dhananjay Munde
Dhananjay Munde : “पंकजाताईने मन मोठं केलं म्हणून…”, धनंजय मुंडेंचं परळीकरांसमोर वक्तव्य; म्हणाले, “मतदारसंघात लोकसभा निवडणुकीवेळी…”
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
sana malik
Sana Malik : “नवाब मलिक तुरुंगात असताना पक्षातील लोकांनी…”, सना मलिक यांचा गंभीर आरोप!
Mithun Chakraborty gets threat from pakistani gangster Shahzad Bhatti
पाकिस्तानी गँगस्टरकडून मिथुन चक्रवर्ती यांना धमकी, मुस्लिमांबद्दल केलेल्या ‘त्या’ वक्तव्याचा उल्लेख करत म्हणाला…
Uddhav Thackeray News Update News
“महाराष्ट्र दरोडेखोर अन् गुंडांच्या हाती”, उद्धव ठाकरेंची शिंदे गटावर सडकून टीका; पक्षचिन्हावरून माजी सरन्यायाधीशांनाही केलं लक्ष्य; म्हणाले…
mallikarjun kharge replied pm narendra
“पंतप्रधान मोदी म्हणजे ‘झुटों के सरदार’, त्यांनी हेच लाल संविधान…”; ‘त्या’ टीकेला मल्लिकार्जून खरगेंचं प्रत्युत्तर!
loksatta readers feedback
लोकमानस: धोरणांचा प्रचार झालाच नाही

अजित पवारांचं संभाजी महाराजांबद्दलचं विधान आणि भाजपाचं आंदोलन यावर भाष्य करता अमोल मिटकरी म्हणाले, “देशात आणि राज्यात दोन्ही ठिकाणी औरंगजेबाचे वारसदार बसले आहेत. कारण जेव्हा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला, त्यावेळी भाजपाचा एकही व्यक्ती रस्त्यावर आंदोलन करताना दिसला नाही.”

हेही वाचा- “छत्रपती संभाजी महाराजांना धर्मवीर म्हणायचे असेल तर…”, शरद पवार यांचे मोठे वक्तव्य

“आज छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर नव्हते, ते स्वराज्यरक्षक होते… असं जेव्हा अजित पवार बोलले, तेव्हा एका सुरात भारतीय जनता पार्टीची लोक पेटायला लागली. अरे इतकं पेटायचं काय कारण आहे? तो भगतसिंह कोश्यारी तुमचा जावई लागतो का?” असा सवाल मिटकरींनी विचारला.

हेही वाचा- “शिंदे गट गँगवॉरमध्ये मारला जाईल”; राऊतांच्या विधानावर संजय गायकवाडांची प्रतिक्रिया, म्हणाले, “आमच्या टोळक्याचं…”

“जेव्हा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, चंद्रकांत पाटील आणि मंगलप्रभात लोढा यांनी महापुरुषांचा अवमान केला, त्याविरोधात एकही ‘माई का लाल’ पुढे आला नाही. आता सगळेजण एका माणसाविरुद्ध आंदोलन करत आहेत,” अशी टीका मिटकरींनी केली.