Amol Mitkari On Chhagan Bhujbal : महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला. मात्र, या मंत्रिमंडळातून अनेक मोठ्या नेत्यांना डावलण्यात आलं. त्यामुळे महायुतीमधील अनेक नेते नाराज झाले. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते छगन भुजबळ यांचाही समावेश आहे. मंत्रिमंडळात संधी न मिळाल्याने छगन भुजबळ यांनी आपली जाहीर नाराजी बोलून दाखवली. एवढंच नाही तर जहां नहीं चैना, वहां नहीं रहना, असं सूचक विधानही भुजबळ यांनी केलं. त्यानंतर आपण पुढील भूमिका कार्यकर्त्य़ांशी बोलून घेणार असल्याचंही ते म्हणाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

त्यानंतर आज छगन भुजबळ यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधत खदखद व्यक्त केली. यावेळी बोलताना भुजबळांचा अप्रत्यक्ष रोख अजित पवारांकडे होता. आता यावरूनच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी छगन भुजबळ यांच्या नाराजीवर बोलताना एक महत्वाचं विधान केलं आहे. ‘उपमुख्यमंत्री अजित पवार यांची चूक काय? हे एकदा छगन भुजबळ यांनी सांगावं’, असं अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा : Ramdas Athawale : अमित शाह यांच्या ‘त्या’ विधानावर रामदास आठवलेंची प्रतिक्रिया; म्हणाले, “काँग्रेस जाणूनबुजून…”

अमोल मिटकरी काय म्हणाले?

“मला या गोष्टीच जास्त वाईट वाटतं की छगन भुजबळ यांच्यासारखा नेता, त्यांना आम्ही वरिष्ठ मानतो. त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना टार्गेट करावं हे मनाला न पटणार आहे. अजित पवार यांची काय चूक आहे हे एकदा छगन भुजबळ यांनी सांगितलं पाहिजे. छगन भुजबळांनी अजित पवारांना टार्गेट करावं, हे माझ्यासारख्या चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्याला न पटणार आणि असह्य होणारं आहे.खरं तर छगन भुजबळ यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती. छगन भुजबळ हे अजित पवार यांच्यावर बोलतात हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला न पटणारं आहे. मला असं वाटतं की भुजबळांचा नाराजीचा सूर असेल तर त्यांनी एकदम न सांगता सामंज्यस्याने सांगितलं पाहिजे”, असं अमोल मिटकरी यांनी म्हटलं. ते एबीपी माझा या वृत्तवाहीनीशी बोलत होते.

प्रश्न फक्त मंत्रिपदाचा नाही तर अस्मितेचा : छगन भुजबळ

“मी आमदार होणं किंवा मंत्री होणं हे माझं काम नाही. मला मंत्रिपदाची हाव असती तर मी १६ नोव्हेंबरला राजीनामा देऊन १७ नोव्हेंबरला आलो नसतो. मी राजीनामा दिला होता पण उल्लेख केला नाही कारण मला तसे फोन सारखे येत होते. मी राजीनामा दिला होता हे मी अडीच महिन्यांनी सांगितलं. माझ्याविरोधात अर्वाच्य बोललं गेलं तेव्हा मी सांगितलं. प्रश्न फक्त मंत्रिपदाचा नाही तर अस्मितेचा आहे. एखाद्या समाजाला बरोबर घेऊन लढणारी माणसं आपल्याकडे आहेत. कुणीही दुःखात राहण्याचं कारण नाही. कभी डर न लगा मुझे फासला देखकर, मै बढता गया रास्ता देख कर, खुदही खुद नजदिक आती गयी मंजिल मेरा बुलंद हौसला देखकर”, असं छगन भुजबळ यांनी आज कार्यकर्त्यांशी बोलताना म्हटलं.

“मंत्रिपद मिळालं नाही तरीही मी रस्त्यावर आहे. अवहेलनचं शल्य मनात आहे. मी तुम्हा सगळ्यांशी चर्चा करुन पुढचं पाऊल उचलणार आहे. विचारपूर्वक निर्णय घेन. मै मौसम नहीं जो पल में बदल जाऊं, मै उस पुराने जमाने का सिक्का हूँ, ऐसेही फेक न देना तुम्हारे बुरे वक्तमें”, असंही छगन भुजबळ यांनी म्हटलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amol mitkari on chhagan bhujbal mahayuti cabinet expansion in ncp ajit pawar group maharashtra politics gkt